कोरोनाचा फटका ; ९० दिवसात ९० हजार मॅट्रिक टन द्राक्ष केली निर्यात

या वर्षी देखील कोरोना, अवकाळी पावसाचा फटका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला असून निर्यातक्षम द्राक्षाचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात गडगडले आहेत.१०० ते १२० रुपये किलो दराने निर्यात होणारी द्राक्षे सद्यःस्थितीत १५ ते २० रुपये बाजारभावाने विकली जात आहेत.

   

  लासलगाव:  द्राक्ष पंढरी आणि वाइन कॅपिटल म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यातुन द्राक्ष निर्यात अनेक संकटावर मात करत सुरू असून या हंगामातील ९० दिवसात ६७२१ कंटेनर मधून नाशिकसह राज्यातून ९० हजार मॅट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली आहे.मागील वर्षाच्या तुलनेत २ हजार ५०० मॅट्रिक टन द्राक्ष निर्यातीत घट झाली आह

  मागील वर्षी प्रमाणे या वर्षी देखील कोरोना, अवकाळी चा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला असून निर्यातक्षम द्राक्षाचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात गडगडले आहेत.१०० ते १२० रुपये किलो दराने निर्यात होणारी द्राक्षे सद्यःस्थितीत १५ ते २० रुपये बाजारभावाने विकली जात आहेत. किलोमागे ७० ते ८० रुपयांचा तोटा द्राक्ष उत्पादकांना सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे जगातील सर्वांत मोठ्या मालवाहतूक जहाजांपैकी पनामाचे एम. व्ही. एव्हरग्रीन जहाज चीनहून नेदरलँडकडे जाताना सुएझ कालव्यात जहाज सरकून तिरके झाले होते. त्यामुळे कालव्यातून होणारी वाहतूक ठप्प झाली होती. त्यात युरोप आणि रशियाकडे निघालेल्या द्राक्षांच्या १ हजार ८०० कंटेनरचा समावेश होता यामुळे देखील व्यापारी संकटात सापडले होते मोठ्या शर्थी नंतर हा मार्ग सुरू झाला आहे.

  परदेशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने लॉकडाउनची टांगतील तलवार, केंद्र शासनाने निर्यातीवरील अनुदान हटविताना केलेली कंटेनरची भाडेवाढ, अशा प्रतिकूल स्थितीने द्राक्षांच्या निर्यातीत मोठा अडथळे निर्माण होत आहेत. त्याचा परिणाम मागील वर्षाच्या तुलनेत २ हजार ५०० मॅट्रिक टन द्राक्ष निर्यातीत घट झाली आहे.

  यंदाची प्रमुख देशातील द्राक्ष निर्यात

  नेदरलँड – ४४०१ कंटेनर – ५८३२४ मॅट्रिक टन

  युनायटेड किंडम- ११२१ कंटेनर – १५७४७ मॅट्रिक टन

  जर्मनी -६५२ कंटेनर – ८९५२ मॅट्रिक टन

  फिनलेंड -९० कंटेनर – ११३० मॅट्रिक टन

  डेन्मार्क – ६८ कंटेनर – ८६० मॅट्रिक टन

  लिथुनिया -५५ कंटेनर – ८१२ मॅट्रिक टन