boyfreind burnt alive

मालेगाव (Malegoan) तालुक्यातील रावळगाव येथील रहिवासी असलेल्या मुलीचे देवळा (Deola Man Burning Case) तालुक्यात लोहणेर येथील गोरख बच्छाव सोबत सात वर्षापासून प्रेमसंबंध होते. दोघेही नातेसंबंधातील असल्याचे बोलले जाते. मात्र दोन महिन्यांपूर्वीच त्यांचे ब्रेकअप (Break Up) झाले होते.दोघांच्या ब्रेकअपनंतर मुलीचे दुसरीकडे लग्न ठरले होते. मात्र हे लग्न मोडले. त्यामुळे गोरखनेच मुलीच्या सासरच्यांना सांगून लग्न मोडले, असा मुलीला आणि तिच्या घरच्यांना संशय होता.

  नाशिक: राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या लाेहाेणेर येथील जळीत कांडातील संशयित मुलगी कल्याणी सोनवणे (२३), वडील गोकुळ सोनवणे (५७), आई निर्मला सोनवणे (५२), भाऊ हेमंत सोनवणे (३०) व प्रसाद सोनवणे (१८) यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस काेठडी (Police Custody To Accused Of Deola Man Burning Case) सुनावली आहे. प्रियकराने आपले लग्न माेडले, या संशयावरून प्रेयसीने आपल्या घरच्यांच्या मदतीने प्रियकराला पेटवून दिले हाेते. भाजलेल्या गोरख बच्छाव (Gorakh Bachchav) याच्यावर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

  सात वर्षांपासून प्रेमसंबंध
  दरम्यान, पीडित गाेरख बच्छाव याने कबुली जबाबात आपले आणि कल्याणी हिचे गेल्या सात वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचे सांगितले असून, गेल्या काही दिवसांपासून ती आपल्यावर लग्नासाठी दबाव आणत हाेती. मात्र तिच्या वडिलांचा यास विराेध हाेता, असेही त्याने म्हटले आहे.

  तरुणावर संशय
  मालेगाव तालुक्यातील रावळगाव येथील रहिवासी असलेल्या मुलीचे देवळा तालुक्यात लोहणेर येथील गोरख बच्छाव सोबत सात वर्षापासून प्रेमसंबंध होते. दोघेही नातेसंबंधातील असल्याचे बोलले जाते. मात्र दोन महिन्यांपूर्वीच त्यांचे ब्रेकअप झाले होते. ब्रेकअप का झाले ते कळू शकले नाही. दोघांच्या ब्रेकअपनंतर मुलीचे दुसरीकडे लग्न ठरले होते. मात्र काही कारणाने हे लग्न मोडले. त्यामुळे गोरखनेच मुलीच्या सासरच्यांना सांगून लग्न मोडले, असा मुलीला आणि तिच्या घरच्यांना संशय होता. याच संशयातून त्यांनी गोरखला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या आई, वडील व दोन भाऊ यांनी संगनमताने मुलाच्या डोक्यात वार करुन मुलीने अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. यात तरुण ५५ टक्के भाजल्याची वैद्यकीय सूत्रांकडून माहिती मिळते. देवळा पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत युवकाला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले.

  यांना घेतले ताब्यात
  घटनेची माहिती मिळताच पोलिस निरिक्षक दिलीप लांडगे, निलेश सवकार, सचिन भामरे, सुनील गांगुर्डे, सुरेश कोरडे आदींनी तात्काळ घटस्थळी धाव घेत संशयीत आरोपी यांना ताब्यात घेतले असून वरिष्ठ पोलिस अधिकारी माधुरी कांगने व उपविभागिय अधिकारी अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक दिलीप लांडगे व सहकारी करीत आहे.