सायकलवारी बेतली जीवावर ; नाशिकहून पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी गेलेले ४१ भाविक काेराेनाबाधित

दिंडोरी : तालुक्यातील जानोरी येथील काही युवक पंढरपुरला सायकलवर जावुन आल्यानंतर काही युवक कोरोनाबाधीत आल्याने जानोरीच्या रूग्णसंख्येत वाढ झाल्याने जानोरी दोन दिवस बंद ठेवण्यात आले असून गरज पडल्यास आणखी दिवस वाढण्याबाबत ग्रामपंचायतीच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

दिंडोरी : तालुक्यातील जानोरी येथील काही युवक पंढरपुरला सायकलवर जावुन आल्यानंतर काही युवक कोरोनाबाधीत आल्याने जानोरीच्या रूग्णसंख्येत वाढ झाल्याने जानोरी दोन दिवस बंद ठेवण्यात आले असून गरज पडल्यास आणखी दिवस वाढण्याबाबत ग्रामपंचायतीच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

लाॅकडाऊनचा निर्णय
जानोरी येथे गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्या ही झपाट्याने वाढत असल्याने जानोरी ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांच्या संगनमताने जानोरीचे सरपंच संगीता सरनाईक, उपसरपंच गणेश तिडके व ग्रामविकास अधिकारी के.के. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गावात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि नागरिकांनीही त्याला भरभरून प्रतिसाद दिला आहे.

सायकलपटू आले पाॅझीिटव्ह
काही दिवसांपूर्वी जानोरी येथील सायकललिस्ट पंढरपूर येथे २४ सायकलस्वार गेले असता ते घरी परतल्यानंतर त्यातील काही तरूणांना करोना संदर्भीय लक्षणे दिसू लागल्याने त्यांनी तात्काळ तपासणी करून घेतली त्यात ते पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या सहकाऱ्यांचेदेखील अहवाल खाजगी प्रयोगशाळेत तपासणीसाठी दिले असता १३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर पुन्हा त्यांच्या संपर्कातील व्यक्तिंची तपासणी केली असता त्यांचे व गावातील इतर रूग्ण असे एकूण ४१ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. त्यात ४१ पैकी १० रुग्ण खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती व्यवसि्थत आहे. उर्वरित काेराेनाबाधितांना घरीच क्वारंटाईन करून उपचार सुरू असून, त्यांचीही प्रकृतीत सुधारणा झाली आहे.

ग्रामपंचायतीची तत्परता
एकूण १४ कंटेनमेंट झोन करण्यात आले असून, ४ टीम सर्वेक्षण करत आहे. ४०८ नागरिकांचे सर्वेक्षण सुरू आहे अशाप्रकारे जानोरीत काही दिवसापासून रुग्ण संख्या वाढत असल्याने जणूकाही जानोरीकरांचा काळजाचा ठोका चुकला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने तात्काळ सर्व ग्रामस्थांच्यावतीने लॉकडाऊनचा निर्णय घेतला असून, आतापर्यंत जुलै महिन्यापासून जानोरी येथे १२७ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे. तर आता सध्या परिस्थितीमध्ये ४१ रुग्ण पॉझिटिव्ह आहे.

जानाेरी काेराेनामुक्त करणार
आरोग्य विभागाचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोशिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य आरोग्य विभाग जोमाने काम सुरू केले असून लवकरच जानोरी गाव काेराेेनामुक्त करण्याचा संकल्प आरोग्य विभागाने केला असून, त्यात लवकरच यशस्वी हाेऊ, असा विश्वास ग्रामपंचायतीकडून व्यक्त केला जात आहे.

जानोरी ते पंढरपूरला जाऊन आलेल्या सायकलस्वारांपैकी बहुतेक युवक करोनाबाधीत आढळल्याने जानोरीची एकुण संख्या ४१ वर पोहोचली आहे .त्यातील आठ-दहा युवक खाजगी रुग्णालयात उपचार घेत असून उर्वरित युवक होमकोरोंटाईन मध्ये उपचार घेत आहेत. सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत जानोरी गावात १२७ रुग्ण झाले असून आरोग्य विभागाने जानोरी गाव पूर्ण मुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला असून त्यात लवकरच यशस्वी होऊ असा विश्वास व्यक्त करतो. तरी जानोरी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी दिलेल्या सूचनांचे नियमित पालन करावे, असे आवाहन करतो.

- डॉ. सुजित कोशिरे, तालुका वैद्यकीय अधिकारी