जिल्हा क्रीडा पुरस्कार ; निर्बंध शिथिल झाल्यानंतर वितरण

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक व्दारा दरवर्षी जिल्ह्यातील खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक यांनी क्रीडा क्षेत्रात केलेल्या कार्याचे तसेच योगदानाचे मुल्यमापन होवून त्यांचा गौरव व्हावा व त्यांना क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, या करीता जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतो.

    नाशिक : जिल्ह्यातील चाैघांना जणांना यंदाचा जिल्हा क्रीडा पुरस्कार जाहिर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण दरवर्षी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी करण्यात येते परंतु करोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे निर्बंध शिथिल झाल्यानंतर वितरण करण्यात येणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी सांगितले.

    यांना मिळाला पुरस्कार
    गुणवंत खेळाडू पुरस्कार महिला : कु. ऐश्वर्या सुधाकर शिंदे, दौलत नगर, सोयगांव ता. मालेगाव, गुणवंत खेळाडू पुरस्कार पुरुष : रविंद्र ज्ञानेश्वर कडाळे, मु. पो. पाचोरे वणी, ता. निफाड, क्रीडाप्रकार : कॅनोईंग व कयाकिंग, गुणवंत खेळाडू पुरस्कार, दिव्यांग खेळाडू : कु. गौरी सुनील गर्जे, सातपूर, नाशिक, क्रीडाप्रकार : पॅरा जलतरण, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शरद भास्करराव पाटील, पंचवटी, नाशिक, क्रीडाप्रकार : कबड्डी.
    क्रीडाप्रकार : बेसबॉल

    महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक व्दारा दरवर्षी जिल्ह्यातील खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक यांनी क्रीडा क्षेत्रात केलेल्या कार्याचे तसेच योगदानाचे मुल्यमापन होवून त्यांचा गौरव व्हावा व त्यांना क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, या करीता जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतो.जिल्हा क्रीडा पुरस्काराचे स्वरुप प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, रोख रुपये 10 हजार असे आहे. 24 जानेवारी 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार, सुधारीत तरतुदीनुसार जिल्हा क्रीडा पुरस्काराचे गुणवंत खेळाडू-पुरुष व महिला व दिव्यांग खेळाडू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक या चार प्रकारामध्ये वितरण करण्यात येते.

    त्यानुसार, जिल्हा क्रीडा पुरस्कार गुणवंत खेळाडू पुरुष व महिला व दिव्यांग खेळाडू गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यासाठी जिल्हाभरातून अर्ज मागविण्यात आले होते. यात गुणवंत खेळाडू पुरस्कारासाठी 15, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी 01 व दिव्यांग खेळाडू पुरस्कारासाठी 02 असे एकूण 18 अर्ज प्राप्त झालेले आहेत.

    या अर्जाची जिल्हा क्रीडा पुरस्कार छाननी समिती मार्फत छाननी करण्यात आली असून, यात एक पुरूष खेळाडू एक महिला खेळाडू एक क्रीडा मार्गदर्शक व एक दिव्यांग खेळाडू असे एकूण चार पुरस्कार जाहिर करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी धात्रक यांनी दिली.