शाळेच्या जागेवर रुग्णालय नकाे ; सेनेचा आंदाेलनाचा इशारा

महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या उदासीनतेमुळे शाळेत अहर्ता पात्रता धारक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी असून सुद्धा तुटपुंज्या सुविधा पारंपारिक शिक्षण उपकरणे व भग्न अवस्थेतील शाळांच्या इमारती यामुळे पालक आपल्या पाल्यांना मनपाच्या शाळेत प्रवेश घेणे टाळतात व खाजगी शाळेत प्रवेश घेतात यावर महापालिकेकडून ठोस उपाय योजना न केल्यामुळे पालिकेच्या शाळा दिवसेंदिवस बंद पडत आहे याच पार्श्वभूमीवर गणेश चौकातील शाळेच्या आरक्षित जागेवर हॉस्पिटल बांधण्याचा प्रयत्न भाजपा लोकप्रतिनिधी करत आहेत.

    सिडको : सिडकोतील गणेश चौक येथील शाळेच्या आरक्षित जागेवर मनपा शाळा क्रमांक 68 असून या ठिकाणी भाजपा लोकप्रतिनिधी हॉस्पिटल बांधण्याचा घाट घालत आहे महापालिका शाळा बंद पाडून हॉस्पिटल बांधण्याचा घाट घालू नका अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असे निवेदन शिवसेनेच्या वतीने मनपा आयुक्तांना देण्यात आले.

    महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या उदासीनतेमुळे शाळेत अहर्ता पात्रता धारक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी असून सुद्धा तुटपुंज्या सुविधा पारंपारिक शिक्षण उपकरणे व भग्न अवस्थेतील शाळांच्या इमारती यामुळे पालक आपल्या पाल्यांना मनपाच्या शाळेत प्रवेश घेणे टाळतात व खाजगी शाळेत प्रवेश घेतात यावर महापालिकेकडून ठोस उपाय योजना न केल्यामुळे पालिकेच्या शाळा दिवसेंदिवस बंद पडत आहे याच पार्श्वभूमीवर गणेश चौकातील शाळेच्या आरक्षित जागेवर हॉस्पिटल बांधण्याचा प्रयत्न भाजपा लोकप्रतिनिधी करत आहेत. शाळेच्या आरक्षित जागेवर असलेल्या वास्तूंचा अन्य हॉस्पिटल उद्यान यांसह इतर प्रयोजनासाठी वापर करण्यात येऊ नये उलट अत्याधुनिक शैक्षणिक साहित्य,योग्य सुविधा व शिक्षक पुरवत या बंद पडलेल्या शाळेला पुनर्जीवित करण्यासाठी प्रयत्न करावा अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी शिवसेना विभाग प्रमुख निलेश साळुंखे विभागप्रमुख पवन मटाले विभाग प्रमुख सुयश पाटील, मॉन्टी दळवी, आबा पाटील आदी उपस्थित होते.