डॉ. सुनंदा गोसावींच्या आठवणींना शोकसभेत उजाळा

कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्यावतीने प्रशांत आंबेकर यांनी सुनंदाताई यांचे बालपणापासून मिळालेले प्रेम, जिव्हाळा व्यक्त केला. डॉ. मो. स. गोसावी यांचे बंधू विजय गोसावी यांनी, सुनंदाताई यांच्या पारिवारिक जबाबदाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल विचार व्यक्त केले. सुनंदाताई यांच्या कन्या डॉ. दीप्ती देशपांडे यांनी सुनंदाताई यांचे आई आणि प्राचार्या या दृष्टिकोनातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडले.

    नाशिक : गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एसएमआरके महिला महाविद्यालयात दिवंगत डॉ. सुनंदाताई गोसावी यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. तसेच भावपूर्ण वातावरणात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

    यांचा सहभाग
    याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे डायरेक्टर जनरल व सचिव सर डॉ. मो. स. गोसावी, संस्थेच्या एचआर डायरेक्टर व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे, उपप्राचार्या डॉ. कविता पाटील व डॉ. नीलम बोकील उपस्थित होते.

    यांनी व्यक्त केल्या भावना
    डॉ. बोकील यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेत सुनंदाताई यांनी दिलेल्या योगदानाबद्दल आठवणी सांगितल्या. डॉ. कविता पाटील यांनी त्यांच्या व्यकिमत्वाचे विविध पैलू व्यक्त केले. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. डी. के गोसावी यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला. कनिष्ठ महाविद्यालयाच्यावतीने समन्वयक सुरेखा जोगी यांनी भावना व्यक्त केल्या. व्यावसायिक पाठ्यक्रमाच्या समन्वयक मैथिली लाखे यांनी सुनंदाताई यांच्या प्रेमळ स्वभावाबद्दलचे आपले अनुभव मांडले.

    कला-गुण जाेपासले
    कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्यावतीने प्रशांत आंबेकर यांनी सुनंदाताई यांचे बालपणापासून मिळालेले प्रेम, जिव्हाळा व्यक्त केला. डॉ. मो. स. गोसावी यांचे बंधू विजय गोसावी यांनी, सुनंदाताई यांच्या पारिवारिक जबाबदाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल विचार व्यक्त केले. सुनंदाताई यांच्या कन्या डॉ. दीप्ती देशपांडे यांनी सुनंदाताई यांचे आई आणि प्राचार्या या दृष्टिकोनातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडले. गृहिणीच्या जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांनी शिक्षणक्षेत्रात दिलेले भरीव योगदान स्पष्ट केले. त्याचबरोबर स्वतःचे छंद व कला-गुण यांनाही वेळ दिला, त्याबद्दल आठवणी जाग्या केल्या. डॉ. मो. स. गोसावी यांनी सुनंदाताई यांच्या अध्यात्मिक व्यासंगाबद्दल आठवणी सांगितल्या. छाया लोखंडे व रसिका सप्रे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अविराज तायडे यांनी आभार मानले.

    यांची उपस्थिती
    कार्यक्रमाला महाविद्यालयाचे देणगीदार जयंवत कुलकर्णी, अमिता क्षत्रिय, शैलेश गोसावी, कल्पेश गोसावी, प्रदीप देशपांडे, नेहा शब्दे व श्रेया नारके, तसेच गोसावी व देशपांडे परिवारातील सर्व सदस्य, माजी प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.