‘या’ दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख करणार पक्ष प्रवेश

आसिफ शेख यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने मालेगावातील राजकीय परिस्थिती नक्कीच बदलणार आहे. मालेगाव शहरात शेख कुटुंबिय कॉंग्रेसचे निष्ठावंत मानले जातात. आसिफ शेख यांचे वडील काँग्रेसचे कट्टर समर्थक असून गेल्या कित्येक वर्षांपासून ते काँग्रेसमध्ये सक्रीय आहे. मालेगाव महापालिकेत ही काँग्रेस- शिवसेनेची सत्ता आहे. राष्ट्रवादी मात्र विरोधात आहे.

  नाशिक: मागील महिन्यात काँग्रेसला सोडचिठठी दिलेले मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख २५ मार्चला राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आसिफ शेख (Congress Ex MLA Asif Shaikh Join NCP) आपल्या समर्थकांस पक्षात प्रवेश  घेणार आहेत.

  आपण वव्यक्तिगत कारणासाठी काँग्रेसच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देता असल्याचे त्यांनी सांगितले होते. “गेल्या वीस वर्षापासून मी काँग्रेसमध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम केले. प्रामाणिकपणे काम करताना मालेगावातील जनतेची सेवा केली. माझ्या वैयक्तिक कारणासाठी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. कार्यकर्त्यांशी विचार विनिमय करुन पुढील दिशा ठरविली जाईल. कोणत्या पक्षात प्रवेश करायचा हे सर्वस्वी कार्यकर्त्यांच्या निर्णयावरच अवलंबून असेल. १५ दिवसानंतर अंतिम निर्णय घेऊ” असे आसिफ शेख काँग्रेसला दिलेल्या राजीनाम्यानंतर म्हणाले होते. मात्र राजीनाम्यानंतर ते नेमके कोणत्या पक्षात जाणार याबाबत अनेकांना उत्सुकता होती. आसिफ शेख यांच्यासोबत त्यांचे समर्थक आणि काही नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

  आसिफ शेख यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने मालेगावातील राजकीय परिस्थिती नक्कीच बदलणार आहे. मालेगाव शहरात शेख कुटुंबिय कॉंग्रेसचे निष्ठावंत मानले जातात. आसिफ शेख यांचे वडील काँग्रेसचे कट्टर समर्थक असून गेल्या कित्येक वर्षांपासून ते काँग्रेसमध्ये सक्रीय आहे. मालेगाव महापालिकेत ही काँग्रेस- शिवसेनेची सत्ता आहे. राष्ट्रवादी मात्र विरोधात आहे.

  आसिफ शेख यांचा परिचय

  मालेगाव शहरात शेख कुटुंबिय कॉंग्रेसचे निष्ठावंत मानले जातात.
  आसिफ शेख यांनी १९९८ मध्ये यूथ काँग्रेसचे सचिव पद भूषवले आहे.
  आसिफ शेख हे २००२ ते २०१२ पर्यंत काँग्रेसचे नगरसेवक
  २००५ ते २००७ या कालावधीत ते महापौर झाले.
  २००७ ते २०१२ पर्यंत त्यांनी महापालिकेत गटनेता म्हणून काम पाहिले.
  २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर ते निवडून आले.
  तर २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा एमआयएमचे मौलाना मुफ्ती इस्माईल यांच्याकडून पराभव झाला.