मोफत अंत्यसंस्कार याेजना; साडेतीन कोटीच्या निविदा

ख्रिश्चन समाजातील अंत्यसंस्कारासाठी दोन हजार रुपये प्रति मृतदेह अंत्यविधीसाठी मृतदेहाचे दफन अंत्यसंस्कारासाठीचा मोबदला अदा करण्यास मान्यता दिली आहे. महापालिका हद्दीतील मनपाचे प्राधिकृत अमरधाममध्ये मृतदेहांचे दहन अंत्यसंस्कारासाठी व इतर समाजाच्या मृतदेहांचे दफन विधीसाठी साहित्य मोबदला पुरविणेकामी अंत्यसंस्कार योजना राबविण्यासाठी विभागनिहाय वखारमालक पुरवठादार यांच्याकडून निविदा दर मागून काम करून घेण्यात येते.

  नाशिक : महापालिका हद्दीतील अमरधाममध्ये पुढील तीन वर्ष कालावधीसाठी सर्वधर्मियांसाठी मोफत अंत्यसंस्कार योजना राबविण्यासाठी तीन कोटी २८ लाख ६९ हजार रुपये खर्चाच्या निविदेचा विषय महासभेवर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. आज होणाऱ्या महासभेत यावर निर्णय होणार आहे. मनपातर्फे महापालिका हद्दीत सर्वत्र मोफत अंत्यसंस्कार योजना लागू करण्यात आली आहे. ही योजना सर्वधर्मियांसाठी असून, या योजनेचा कालावधी संपत आल्याने तिला पुढील तीन वर्षांसाठी मुदतवाढ देण्याचा विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

  असा आहे खर्च
  २०१३-१४ साठी मोफत अंत्यसंस्कार योजना राबविण्यासाठी स्थायी समितीने केलेल्या ठरावानुसार जळाऊ लाकडे आठ मन, गोवऱ्या, एक पाटी, मडके एक आणि रॉकेल पाच लिटर प्रति मृतदेह या प्रमाणे साहित्य पुरविण्यात आणि संबंधित अमरधाम मधील पूर्वापार पद्धतीने कार्यरत वखार मालक पुरवठादार यांना प्रथम वर्षासाठी १७४१ प्रति मृतदेह व पाच ते दहा वर्षाच्या बालमृत्यू साठी आठशे सत्तर रुपये प्रति पूर्ण मोबदला अदा करण्यास मान्यता देण्यात आली होती. इतर समाजाच्या लिंगायत, गोसावी, नागपंथी, गवळी समाजाच्या मृतदेहाचे दफन अंत्यसंस्करासाठी १६०० रुपये प्रति मृतदेह व पाच ते दहा वर्षाच्या बालमृत्यूसाठी आठशे रुपये प्रति मृतदेह मोबदला अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मुस्लिम समाजासाठी दोन हजार सातशे रुपये प्रति मृतदेह व पाच ते दहा वर्षाच्या बालमृत्यू साठी एक हजार शंभर रुपये प्रति मृतदेह मोबदला अदा करण्यास मान्यता देण्यात आली होती.

  बाजारभावाप्रमाणे दर
  ख्रिश्चन समाजातील अंत्यसंस्कारासाठी दोन हजार रुपये प्रति मृतदेह अंत्यविधीसाठी मृतदेहाचे दफन अंत्यसंस्कारासाठीचा मोबदला अदा करण्यास मान्यता दिली आहे. महापालिका हद्दीतील मनपाचे प्राधिकृत अमरधाममध्ये मृतदेहांचे दहन अंत्यसंस्कारासाठी व इतर समाजाच्या मृतदेहांचे दफन विधीसाठी साहित्य मोबदला पुरविणेकामी अंत्यसंस्कार योजना राबविण्यासाठी विभागनिहाय वखारमालक पुरवठादार यांच्याकडून निविदा दर मागून काम करून घेण्यात येते. त्यानुसार प्रतिमृत्यू अपेक्षित खर्च सद्यस्थितीतील बाजारभावानुसार पुढीलप्रमाणे आहेत. प्रति मृतदेहाचे दहन अंत्यसंस्कारासाठीचा खर्च व जळाऊ लाकूड ३२० किलो ग्रॅम गोवऱ्या पंचवीस नग मडके एक, ३ लिटर रॉकेल याप्रमाणे अाहे.

  तीन वर्षांसाठी निविदा
  सद्यस्थितीत कार्यरत ठेकेदार पुरवठादार वखार मालक यांच्या कामाची मुदत एक मार्च दोन हजार बावीस रोजी संपुष्टात येत असून पुढील दोन हजार बावीस तेवीस दोन हजार २३-२४ व दोन हजार चोवीस पंचवीस या तीन वर्षाच्या कालावधीसाठी नवीन निविदा प्रक्रिया राबविण्यास ३ कोटी २८ लाख ६९ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित ठेवण्यात आला आहे. हा विषय आज होणाऱ्या महासभेवर ठेवण्यात आला आहे.