बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या! छगन भुजबळांच्या मागणीचे मंत्री दादा भुसे यांच्याकडून समर्थन 

    नाशिक : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. यानिमित्ताने बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या अशी मागणी होत आहे. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मागणीचे मंत्री दादा भुसे यांच्याकडून समर्थन करण्यात आले आहे( Give Bharat Ratna to Balasaheb Thackeray! Minister Dada Bhuse supports Chhagan Bhujbal’s demand ).

    पालकमंत्री छगन भुजबळ आज येवला मध्ये विविध विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी आले असता. बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्यावा अशी मागणी होत आहे याबद्दल भुजबळ यांना विचारले असता भुजबळ म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न दिला म्हणजे ते लहान किंवा मोठे होणार असं काही नाही बाळासाहेब ठाकरे हे हिंदुहृदयसम्राट म्हणूनच मोठे राहणार असून बाळासाहेब ठाकरे यांचे नाव हिंदुहृदयसम्राट सम्राट म्हणून जगात नाव आहे.

    तर कृषी मंत्री दादा भुसे हे देखील आज येवला येथे वीर चक्र प्राप्त माजी सैनिक यांच्या निवासस्थानाचे भूमिपूजनासाठी आले असता यावेळी त्यांना विचारले असता की बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी होत आहे.त्यावर दादा भुसे म्हणाले की या मागणीचा मी समर्थन करतो.

    भारतरत्नला शोभेशी अशी मागणी असून बाळासाहेब ठाकरे यांनी अथक कष्ट करून शून्यातून हे विश्व निर्माण केले आहे. म्हणून या मागणीचे समर्थन करत आहे. संपूर्ण देशाने याची नोंद घेऊन शिवसेना प्रमुख हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्यावा असे कृषी मंत्री दादा भुसे यांनी म्हटले आहे.

    हे सुद्धा वाचा
    • 2022