गोदावरीला या वषार्तील पहिला माेठा पूर; गंगापूर धरणातून ६ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

सतत काेसळधार सुरू असल्यामुळे धरणातून वेळाेवेळी पाण्याचा विसर्ग करावा लागत आहे. त्यात शहरातील पाणी तसेच उपनद्यांचे पाणी गाेदावरीत मिसळल्याने गाेदामाई प्रथमच दुथडी भरून वाहू लागली. अनेकांना पूर पाहण्याचा माेह आवरता आला नाही. प्रशासनाकडून वेळाेवेळी खबरदारीच्या सूचना देण्यात येत हाेत्या.

    नाशिक : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरु आहे. परिणामी गंगापूर धरणातून दुपारी १ वाजेच्या सुमारास ६ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गोदावरी नदीला माेठा पूर आला आहे.

    बुधवारी रात्रभर धरणाच्या पाणलोट क्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या अनेक भागांत पावसाची संततधार सुरु असल्याने धरण ९८ टक्के भरले आहे. सततचा पाऊस पडत असल्यामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ हाेत असल्यामुळे धरणातून विसर्ग केला जात आहे.

    ६ हजार क्युसेक्सचा विसर्ग
    आज सकाळी साडेआठच वाजेच्या सुमारास गंगापूर धरणातून एक हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पाण्याचा विसर्ग टप्प्या टप्याने वाढविण्यात येत असून दुपारी ६ हजार क्युसेक्स करण्यात आला. दवतत पाऊस सुरू रािहला तर दुपारी दोन वाजेनंतर पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढिवण्याची शक्यता असून, गाेदावरीतील पाण्याची पातळी वाढणार असल्यामुळे नदीकाठी सावधानता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

    गटारीचे पाणी रस्त्यावर
    शहरात थाेडा पाऊस पडला तरी भुयारी गटार याेजनेचे पितळ उघडे पडायला सुरूवात हाेते. रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी गटारी तुंबल्यामुळे ते पाणी थेट रस्त्यावर आल्याचे चित्र काही ठिकाणी पहावयास मिळाले. याचा फटका नागिरकांना बसला.

    गाेदामाई दुथडी भरली