ग्रंथदिंडीने ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरूवात; पावसामुळे ग्रंथदिंडीचा मार्ग बदलला, नवीन मार्गाने होणार मार्गस्थ

नाशिकमध्ये पाऊस परिस्थिती असल्यामुळे ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (94th Marathi Sahitya Sammelan, Nashik) ग्रंथदिंडी (Granthdindi) नियोजनात थोडा बदल करण्यात आलेला आहे. ग्रंथ दिंडीचे आज (३ डिसेंबर २१) सकाळी ८ वाजता प्रस्थान कुसुमाग्रज निवासस्थान (टिळकवाडी) येथून होणार आहे.

    कुसुमाग्रज नगरी, नाशिक : ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (94th Marathi Sahitya Sammelan, Nashik) आजपासून सुरू होणार आहे. या सोहळ्यावर कोरोनाचे असलेले सावट पाहता संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर, फादर दिब्रेटो आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रकृतीच्या कारणास्तव या सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाही. हे सर्व ऑनलाईन या सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

    नाशिकमध्ये पाऊस परिस्थिती असल्यामुळे ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (94th Marathi Sahitya Sammelan, Nashik) ग्रंथदिंडी (Granthdindi) नियोजनात थोडा बदल करण्यात आलेला आहे. ग्रंथ दिंडीचे आज (३ डिसेंबर २१) सकाळी ८ वाजता प्रस्थान कुसुमाग्रज निवासस्थान (टिळकवाडी) येथून होणार आहे.

    पुढे ग्रंथदिंडी महापौर बंगल्यावरून रेमंड सिग्नलला उजवीकडे वळणार आहे. जुने सीबीएस सिग्नल ओलांडून डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शिवाजी रोड वरून नाशिक जिमखान्याच्या दिशेने कूच करेल , सागरमल मोदी शाळा, सारडा कन्या शाळा, परशुराम सायखेडकर नाट्यगृह वरून सार्वजनिक वाचनालय येथे विसाव्यासाठी थांबणार आहे. त्यानंतर ग्रंथ पालखी संमेलनस्थळी कुसुमाग्रज नगरी भुजबळ नॉलेज सिटी येथे जाणार आहे.