पत्नीच्या विरहाने पतीची आत्महत्या ; नाशिक येथील घटना 

सातपूर परिसरातील अशाेकनगर भागात वास्तव्यास असलेल्या रवींद्र देवरे यांच्या पत्नीची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ हाेती. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू हाेते. त्या काेराेनाबाधित आढळून आल्यामुळे त्यांच्यावर काेराेनाचे उपचार करण्यात येत होते.

    नाशिक : शहरात काेराेनाचा कहर दिवसेंदिवस वाढताे आहे. सातपूर परिसरातील रवींद्र देवरे (५२) यांच्या पत्नी काेराेेनाबाधित झाल्याने त्यांच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरू हाेते. परंतु दुर्दैवाने त्यांच्या पत्नीचे निधन झाले. मात्र पत्नीचा विरह सहन न झाल्याने देवरे यांनीदेखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याने सातपूर परिसरात खळबळ उडाली आहे.

    सातपूर परिसरातील अशाेकनगर भागात वास्तव्यास असलेल्या रवींद्र देवरे यांच्या पत्नीची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ हाेती. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू हाेते. त्या काेराेनाबाधित आढळून आल्यामुळे त्यांच्यावर काेराेनाचे उपचार करण्यात येत होते. दरम्यान, पत्नीचे निधन झाल्याची माहिती पती रवींद्र देवरे यांना मिळाली. पत्नीच्या विरहाने पतीनेही घरातच गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती समजते आहे.