नवरा असावा तर असा! ‘जन्मोजन्मी हीच बायको’ मिळावी म्हणून ते करतात सावित्रीचे पूजन

सात जन्म हाच पती मिळावा, पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला वटसावित्रीचे पूजन करतात. आपल्या सौभाग्याचं लेणं सुरक्षित राहावे हा या पूजेमागचा मूळ असतो. एरवी महिलाच ही पूजा करताना दिसतात. मात्र, जिच्या सोबत संपूर्ण आयुष्य घालवितो तिच्याही भाव भावनांचा विचार करायला नको का?

    बाबा पवार, देवळा : जन्मोजन्मी हीच बायको मिळावी म्हणून गेल्या सहा वर्षांपासून देवळा येथील एक पुरुष सावित्रीचे पूजन करतो. ऐकून नवल वाटलं असेल ना! मात्र हे खरे आहे, देवळा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व शिवसंग्राम युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष उदयकुमार आहेर ‘हीच बायको हवी’ म्हणून वट सावित्रीचे पूजन गेल्या सहा वर्षांपासून करतात.

    सात जन्म हाच पती मिळावा, पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला वटसावित्रीचे पूजन करतात. आपल्या सौभाग्याचं लेणं सुरक्षित राहावे हा या पूजेमागचा मूळ असतो. एरवी महिलाच ही पूजा करताना दिसतात. मात्र, जिच्या सोबत संपूर्ण आयुष्य घालवितो तिच्याही भाव भावनांचा विचार करायला नको का? या दृष्टीने देवळा येथील उदयकुमार आहेर ‘हीच बायको हवी’ म्हणून वट सावित्रीचे पूजन करतात. आहेरांचा हा पूजाविधी गेल्या सहा वर्षांपासून सुरू आहे. आपल्या पत्नीसाठी सावित्री पूजन करणाऱ्या या पतीराजा सोबत त्यांची पत्नी अश्विनी आहेर देखील पूजेत सहभागी होतात. आहेरांच्या या आगळ्या वेगळ्या प्रयोगामुळे कुतूहल निर्माण झाले आहे. हे व्रत करणारे कदाचित ते एकमेव असावेत. स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करीत हीच बायको ७ नव्हे तर ७० जन्म हवी म्हणून म्हणून गेल्या सहा वर्षांपासून पूजा करीत आहे. आमच्या सौभाग्यवतींचे गेल्या १७ वर्षांपासून हे व्रत करीत असल्याचे उदयकुमार आहेर यांनी सांगितले.

    जन्मोजन्मी हीच पत्नी हवी यासाठी मी हे व्रत करत असतो. या व्रताचे हे माझे सहावे वर्ष आहे. त्या निमित्ताने आज देखील माझा उपवास आहे मात्र या वेळेस मी कामानिमित्त पुण्याला व सौ. अश्विनी या माहेरी असल्याने एकत्रित पूजा करता आली नाही.

    - उदयकुमार आहेर