ज्येष्ठ लेखक व पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर साहित्य संमेलनात शाईफेक

गिरीश कुबेर यांनी Renaissance State: The Unwritten Story of the Making of Maharashtra हे पुस्तक लहिलं आहे. यामध्ये संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह माहिती प्रसिद्ध केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. याचा निषेध करण्यासाठी संभाजी ब्रिगेडने कुबेर यांच्यावर शाईफेक केली. मात्र यानंतर संभाजी ब्रिगेडच्या प्रतिनीधींना यासंदर्भात महिती विचारल्यानंतर पुस्तकात काय आहे, हे दूरच, पण पुस्तकाचं नावंही सांगता आलं नाही. त्यामुळे संभाजी ब्रिगेडने कोणत्या आधारे हे कृत्य केलं, या स्पष्टीकरण पाहाणं महत्वाचं आहे.

    नाशिकच्या साहित्य संमेलनात धक्कादायक प्रकार घडला आहे. नाशिकमध्ये आज संमेलनाचा शेवटचा दिवस होता. कार्यक्रमाची सांगता होत असताना वरिष्ठ पत्रकार आणि लेखक गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केल्याचं समोर आलंय. यावर संभाजी ब्रिगेडने स्पष्टीकरणही दिलंय. संभाजी राजांचा अपमान करणारं पुस्तर लिहिल्याचा आरोप गिरीश कुबेर यांच्यावर करण्यात आला. त्यातूनच शाईफेक केल्याचं संभाजी ब्रिगेडने सांगितलं.

    दुपारच्या सुमारास परिसंवाद होणार होता. मुख्य गेटजवळ गिरीश कुबेर यांच्या चेहऱ्यावर काळं फासण्यात आलं. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या दोन लोकांनी पत्रकंही भिरकावली. छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी करणाऱ्या गिरीश कुबेर यांचा जाहीर निषेध असं या पत्रकात लिहिण्यात आलं होतं.

    गिरीश कुबेर यांनी Renaissance State: The Unwritten Story of the Making of Maharashtra हे पुस्तक लहिलं आहे. यामध्ये संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह माहिती प्रसिद्ध केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. याचा निषेध करण्यासाठी संभाजी ब्रिगेडने कुबेर यांच्यावर शाईफेक केली. मात्र यानंतर संभाजी ब्रिगेडच्या प्रतिनीधींना यासंदर्भात महिती विचारल्यानंतर पुस्तकात काय आहे, हे दूरच, पण पुस्तकाचं नावंही सांगता आलं नाही. त्यामुळे संभाजी ब्रिगेडने कोणत्या आधारे हे कृत्य केलं, या स्पष्टीकरण पाहाणं महत्वाचं आहे.

    ‘आम्ही या घटनेचा निषेध करतो. सुंदर चाललेल्या संमेलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचंही’, जयप्रकाश जातेगावकर यांनी आपली प्रतिक्रिया झी 24 तासला दिली आहे. या घटनेनंतर गिरीश कुबेर परिसंवादासाठी व्यासपिठावर उपस्थित होते. तसंच साहित्य संमेलनातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.