girish mahajan

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मुलाच्या विवाह प्रसंगी राज्यातील विविध नेत्यांनी हजेरी लावली. त्यावेळी सर्व नेते एकत्र असतांना महाजन आणि पाटील यांच्यात कलगीतुरा पाहायला मिळाला. झाले असे की, सर्वजण मतभेद विसरून गप्पा मारत होते. यावेळी गिरीश महाजन यांनी नवदाम्पत्यास शुभेच्छा देता देता, गुलाबराव पाटलांकडे बघून, ‘विरोधी पक्षाकडून भाऊ शुभेच्छा तुम्हाला घ्याव्या लागतील.

    नाशिक :  ‘भाऊ तुम्हाला विरोधी पक्षाकडून आज शुभेच्छा तुम्हाला घ्याव्या लागतील. कारण सर्व सत्ताधारी नेते इथे आले आहेत. जयंत पाटील तुम्ही आमचा २५ वर्षांचा संसार माेडण्याचे पाप केले, असे म्हणत गिरीश महाजन यांनी जयंत पाटलांना टाेला लगावला. तर जयंत पाटलांनी तुमचा संसार का माेडला हे उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे, त्यामुळे आमचे नाव घेऊ नका, असे म्हणत गिरीश महाजनांना प्रतिटाेेला लगावला.

    …तुम्ही संसार माेडला
    राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मुलाच्या विवाह प्रसंगी राज्यातील विविध नेत्यांनी हजेरी लावली. त्यावेळी सर्व नेते एकत्र असतांना महाजन आणि पाटील यांच्यात कलगीतुरा पाहायला मिळाला. झाले असे की, सर्वजण मतभेद विसरून गप्पा मारत होते. यावेळी गिरीश महाजन यांनी नवदाम्पत्यास शुभेच्छा देता देता, गुलाबराव पाटलांकडे बघून, ‘विरोधी पक्षाकडून भाऊ शुभेच्छा तुम्हाला घ्याव्या लागतील. कारण सर्व सत्ताधारी नेते इथे आले आहेत आणि आमचा २५ वर्षांचा संसार होता, पण तो संसार तुम्ही मोडला, असे म्हणत त्यांनी टोला लगावला. मात्र गिरीश महाजनांना जयंत पाटील यांनी उत्तर दिल.’त्यांची ती खंत आहे, दुःख आहे. आम्ही फारस लक्ष देत नाही, असे म्हणत त्यांचा संसार का मोडला आहे. याच उत्तर उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी दिल आहे’, असा प्रतिटोला जयंत पाटील यांनी यावेळी लगावला. तर नवाब मलिक यांनी ही गिरीश महाजनांचा समाचार घेतला. आज इथं संसार जोडत आहे. आज शुभ दिनी त्यांनी शुभ बोलायला पाहिजे होत.मात्र ते अपशब्द बोलले..

    यांची उपस्थिती
    या विवाह प्रसंगी हजारोंच्या संख्यने नागरिक उपस्थित होते. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, भाजप नेते गिरीश महाजन, कृषीमंत्री दादा भुसे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, परिवहन मंत्री अनिल परब, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक, उदय सामंत, अदिती तटकरे यांच्यासह अनेक महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी हजरी लावली.