लासलगावला कांद्याच्या भावात 275 रुपयांची घसरण ; शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ.

गेल्या आठवड्यातील गुरुवारच्या तुलनेत आज सोमवारी लाल कांद्याच्या कमाल बाजारभावात 275 रुपयांची तर 5 मार्चच्या तुलनेत 1 हजार रुपयांची मोठी घसरण झाल्याने कांद्याचे बाजार भाव 900 रुपयांच्या आता आलेले असल्याने शेतकऱ्याला उत्पादन खर्च बाराशे ते पंधराशे रुपये आला असून पाचशे रुपयांनी विकावा लागला आहे.

    नाशिक : कांद्याची नगरी म्हणून ओळख असलेल्या लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याच्या (Red Onion) भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत 275 रुपयांची तर पंधरा दिवसात एक हजार रुपयांनी कांद्याच्या बाजारभावात घसरण झाली आहे. लाल कांद्याचे कमाल 852 रुपये, किमान 300 रुपये तर सर्वसाधारण 650 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली.

    कांदा आवक वाढल्याने कांदा भावात घसरण. मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान या ठिकाणी तसेच लाल नवीन कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात दाखल होत असल्याने राज्यात नाशिक, अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील चाकण आणि सोलापूर या भागातही नवीन उन्हाळ कांद्याची, लाल कांद्याच्या बरोबरीने आवक दाखल होत असल्याने याचा थेट परिणाम कांद्याच्या बाजार भाववर झाला आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कांदा बाजार आवारावर गेल्या आठवड्यातील गुरुवारच्या तुलनेत आज सोमवारी लाल कांद्याच्या कमाल बाजारभावात 275 रुपयांची तर 5 मार्चच्या तुलनेत 1 हजार रुपयांची मोठी घसरण झाल्याने कांद्याचे बाजार भाव 900 रुपयांच्या आता आलेले असल्याने शेतकऱ्याला उत्पादन खर्च बाराशे ते पंधराशे रुपये आला असून पाचशे रुपयांनी विकावा लागला आहे. त्यामुळे तोट्यात सहन करण्याची वेळ कांदा उत्पादक शेतकऱ्यावर आली आहे.