निफाड तालुक्यात बिबट्या जेरबंद

लासलगाव : निफाड तालुक्यातील तारुखेडले येथे अनेक दिवसांपासून दर्शन देणारा बिबट्या अखेर मंगळवारी रात्री वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे यामुळे स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.

लासलगाव : निफाड तालुक्यातील तारुखेडले येथे अनेक दिवसांपासून दर्शन देणारा बिबट्या अखेर मंगळवारी रात्री वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे यामुळे स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.

तारुखेडले येथील भाऊसाहेब सांगळे यांच्या उसाच्या शेतात निफाड वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी गेल्या सात दिवसांपासून पिंजरा लावला होता परंतु बिबट्या हुलकावणी देत होता अखेर मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा बिबट्या पिंजऱ्यात अडकला आहे सकाळी भाऊसाहेब सांगळे शेतात पाण्याची मोटर सुरु करण्यासाठी गेले असता पिंजऱ्यात काहीतरी अडकल्याचे लक्षात येताच त्यांनी बघितले आणि बिबट्या असल्याने तातडीने वन विभागाला याची माहिती दिली वन विभागाचे वनक्षेत्र अधिकारी संजय भंडारी व कर्मचारी तारुखेडले येथे पिंजरा असलेल्या ठिकाणी दाखल होत पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला ताब्यात घेतले हा बिबट्या अंदाजे तीन वर्षाचा असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे या बिबट्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर याला पुन्हा जंगलात सोडून देण्यात येणार आहे