
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या(Maharashtra University Of Health Sciences) कुलगुरू पदाच्या निवडीकरिता शासनाकडून शोध समिती गठीत करण्यात आली होती. त्यामुळे विद्यापीठाच्या प्रभारी पदाचा कार्यभार पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे होता. कुलपती कार्यालयाने आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर(Madhuri Kanitkar) यांची निवड केली त्यानंतर आज त्यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारला.
नाशिकः महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या(Maharashtra University Of Health Sciences) कुलगुरू पदाचा कार्यभार लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर(Madhuri Kanitkar Took Charge As A Vice Chancellor Of Maharashtra University Of Health Sciences) यांनी प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडून स्वीकारला. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू पदाच्या निवडीकरिता शासनाकडून शोध समिती गठीत करण्यात आली होती. त्यामुळे विद्यापीठाच्या प्रभारी पदाचा कार्यभार पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे होता. कुलपती कार्यालयाने आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची निवड केली त्यानंतर आज त्यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारला.
यावेळी लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर म्हणाल्या, विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा कार्यभार स्वीकारताना मला आनंद होत आहे. विद्यापीठ हे शिक्षणाचे केंद्र आहे. यामध्ये विविध विषयांवर संशोधन व उपक्रम होणे गरजेचे आहे. यासाठी विद्यापीठाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करून कामकाज करणार आहे. यामुळे अल्प, मध्यम अणि दीर्घ मुदतीत विद्यापीठाच्या एकूणच कामकाजाची दिशा ठरवली जाणार आहे. माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत सक्षमतेने पोहचणे शक्य होणार आहे. आरोग्य शिक्षण क्षेत्रात कोविड-१९ च्या काळात आलेल्या अडचणींची पुनरावृती होऊ नये यासाठी व्यापक प्रमाणात बदलाची गरज आहे. यासंदर्भात विषयतज्ज्ञ व त्या-त्या क्षेत्राशी निगडीत लोकांचा सल्ला आाणि मार्गदर्शनाने कार्याची वाटचाल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. संशोधन विद्यापीठाचे प्रमुख ध्येय असून त्या अनुषंगाने विशेष कार्य केले जाणार आहे. अंतर विद्याशाखा संशोधनावर भर दिला जाणार आहे. रुग्णाला पूर्ण बरे करण्यासाठी सर्वसमावेशक उपचार पद्धतीची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने विद्यार्थी घडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.