थंडी-पावसात नाशकात रंगणार साहित्याचा मुहाकुंभमेळा

अनेक वाद, अडचणी आणि नैसर्गिक अडथळे पार करत, ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपासून तीन दिवस (३, ४ आणि ५ डिसेंबर) भुजबळ नॉलेज सिटीत उभारण्यात आलेल्या कुसुमाग्रज नगरीत रंगणार आहे(Literature festival to be held in Nashik in cold and rainy weather).

    नाशिक : अनेक वाद, अडचणी आणि नैसर्गिक अडथळे पार करत, ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपासून तीन दिवस (३, ४ आणि ५ डिसेंबर) भुजबळ नॉलेज सिटीत उभारण्यात आलेल्या कुसुमाग्रज नगरीत रंगणार आहे(Literature festival to be held in Nashik in cold and rainy weather).

    ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञानवादी लेखक डॉ. जयंत नारळीकर हे या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असतील. तीन दिवस अनेक साहित्यिक, सामाजिक परिसंवाद, कवी संमेलने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी नाशिककरांना मिळणार आहे.

    ऐन थंडीत आणि त्यासोबत गेल्या दोन दिवसांपासून सुरु झालेल्या पावसामुळे संमेलनासमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या खऱ्या. मात्र त्यावर यशस्वीपणे मात करत हा साहित्य सोहळा कुसुमाग्रजांच्या नगरीत रंगणार आहे. कोरोना ओमायक्रॉन कोरोना व्हेरिएंटच्या धोक्यामुळे साहित्य संमेलनात काही नियमही साहित्यप्रेमींना पाळावे लागणार आहेत. त्यात दुहेरी लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश, विनामास्क प्रवेश नाहीयासारखे काही नियम आहेत.