महाविकासाचे तळ्यात-मळ्यात ; राऊतांचे मात्र ‘महापाैर सेनेचा’च

गेल्या महापािलका निवडणुकीत भाजापला पंचवटीकरांनी जवळपास २१ नगरसेवक दिले हाेते. तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांचे विश्वासू बाळासाहेब सानप हे त्यावेळी भाजपात वजनदार नेते हाेते. त्यांनी या भागात भाजपाला माेठे यश मिळवून दिले हाेते.

  नीलेश अलई , नाशिक : विधानसभा निवडणुकांनंतर जवळपास दाेन महिने राेज सकाळी दूरचित्रवाहिन्यांवर येऊन मुख्यमंत्री शिवसेनेचाच अशी गर्जना करणाऱ्या खा. संजय राऊतांनी सध्या नाशकात येऊन महापाैर शिवसेनेचाच अशी गर्जना करायला सुरूवात केली आहे. राज्यात महाविकास आघाडीची स्थापना करण्यात खा. राऊतांचा माेठा सहभाग हाेता. त्याच महाविकास आघाडीचे शहरात मात्र तळ्यात-मळ्यात असतानाही महापाैर शिवसेनेचाच म्हणत खा. राऊत यांनी शिवसैनिकांमध्ये चैतन्य आणण्याचा प्रयत्न केला आहे. महापािलकेत स्थायीच्या निवडणुकीत एक पाऊल मागे घेऊन जळगावात चार पावले पुढे चालणाऱ्या सेनेने नाशकात पुढे काय हाेईल, याचा विचार करण्यास भाजपाला भाग पाडले आहे.

  जळगावमुळे आत्मविश्वास वाढला
  स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेला माघार घ्यावी लागली. यासाठी घाेडेबाजार करायचा नव्हता, असे कारण दिले जात असले तरी यातील ‘किंगमेकर’ने नकार दिल्यामुळेच सेनेला माघार घ्यावी लागली हाेती. जळगावात मात्र शिवसेनेने भाजपाला धक्का दिला. स्पष्ट बहुमत असलेल्या भाजपाकडून महापािलकेची सत्ता हिसकावल्याने शिवसेनेचा आत्मविश्वास आता वाढला आहे. याचा फायदा नाशिक महापािलकेच्या निवडणुकीत शिवसेनेला हाेईल. जळगावच्या विजयामुळे नाशिकच्या कार्यकर्त्यांचे मनाेबलही उंचावले आहे.

  महानगरप्रमुखांचे काैतुक
  खा. संजय राऊत यांनी महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या कामाचे काैतुक केले. उद्धव ठाकरे यांनी नाशिक पॅटर्न राज्यभर राबवण्याचे सांगितल्याचा उल्लेखही त्यांनी केला. आणि त्यानंतर लगेचच महानगरपािलका निवडणुकीसाठी सहा जणांची कमिटी तयार करणार असल्याचे सांगून एकप्रकारे महापालिका निवडणुकीच्या जबाबदारीचे वाटप करणार असल्याचे सांगून बडगुजरांनाही धक्का दिला.

  ‘पंचवटी’कडे सेनेचे लक्ष
  गेल्या महापािलका निवडणुकीत भाजापला पंचवटीकरांनी जवळपास २१ नगरसेवक दिले हाेते. तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांचे विश्वासू बाळासाहेब सानप हे त्यावेळी भाजपात वजनदार नेते हाेते. त्यांनी या भागात भाजपाला माेठे यश मिळवून दिले हाेते. मात्र विधानसभा निवडणुकीत अॅड. राहूल ढिकले यांना पक्षाने उमेदवारी दिल्याने नाराज हाेऊन त्यांनी पक्षांतर केले हाेते. अर्थात आता ते पुन्हा भाजपावासी झाले असले तरी आमदारकी हुकल्याचे सानपांच्या मनात आहेच. त्यामुळे पंचवटी परिसरातील या परिसि्थतीचा फायदा घेण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जाताेय. महानगरप्रमुखपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी या परिसरात अनेक शाखांचे उदघाटनही केले आहे.

  महाविकास आघाडीचे काय?
  महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रित लढेल की नाही, हे निशि्चत नसल्याचे सांगून खा. राऊतांनी आघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याचे कबूल केले आहे. आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी दाेघांनाही आपापल्या पक्षाचा झेंडा महापािलकेवर फडकवायचा असल्याचे खा. राऊत आणि पालकमंत्री भुजबळ यांनी वेळाेवेळी सांगितले आहे. त्यामुळे मनपा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रित लढण्याची शक्यता तशी कमीच आहे. काॅंग्रेसने अजून तरी आमचा झेंडा महापालिकेवर फडकवू, असा दावा केलेला नाही. त्यामुळे महािवकास आघाडीत काॅंग्रेसचा विषय अजून तरी निघत नाहीय.