संमेलनाध्यक्षांविनाच पार पडणार नाशिकमधील साहित्य संमेलन, डॉ. जयंत नारळीकर प्रकृती अस्वास्थामुळे सहभागी होणार नाहीत; आजी- माजी संमेलनाध्यक्षांविना पहिलेच संमेलन

विज्ञानवादी लेखर अशी ओळख असलेले डॉ. नारळीकर (Dr. Jayant Narlikar) त्यांच्या अध्यक्षीय भाषणात काय भूमिका मांडतील, याकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष होते. बदलत्या काळानुसार आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या (Digital Technology) वाढत्या प्रवाहात मराठी भाषा सकस, समृद्ध राहण्यासाठी ते काही उपाययोजना सुचवतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांच्या अनुपस्थितीने अनेक रसिक नाराज झाले आहेत.

    हरीभाऊ सोनावणे, प्रतिनिधी, कुसुमाग्रजनगरी, नाशिक : ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (94th Marathi Sahitya Sammelan, Nashik) हे आजी-माजी संमेलनाध्यांविनाच पार पडणार आहे. या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञानवादी लेखक डॉ. जयंत नारळीकर (Dr. Jayant Narlikar) हे संमेलनाला उपस्थित राहणार नाहीत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते उपस्थित राहणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे. तर मावळते संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस डिब्रिटो (Father Francis Dibrito) हेही प्रकृती अस्वास्थ्यामुळे संमेलनाला उपस्थित राहणार नाहीयेत. त्यामुळे आजी-माजी संमेलनाध्यक्षांविना होणारे हे पहिलेच संमेलन आहे.

    विज्ञानवादी लेखर अशी ओळख असलेले डॉ. नारळीकर (Dr. Jayant Narlikar) त्यांच्या अध्यक्षीय भाषणात काय भूमिका मांडतील, याकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष होते. बदलत्या काळानुसार आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या (Digital Technology) वाढत्या प्रवाहात मराठी भाषा सकस, समृद्ध राहण्यासाठी ते काही उपाययोजना सुचवतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांच्या अनुपस्थितीने अनेक रसिक नाराज झाले आहेत.

    उद्घाटनाच्या मुख्य कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहभागाविषयीही प्रश्नचिन्ह आहे. नुकतीच त्यांची शस्त्रक्रिया हून ते कालच घरी परतले आहेत. अशा स्थितीत ते व्हर्च्युअली तरी संमेलनात सहभागी होतील का, याबाबतही साशंकता आहे.
    मुख्यमंत्रीही अनुपस्थित राहिले तर केवळ पानिपतकार विश्वास पाटील, ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.

    कुठल्याही साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्षांचे विचार हे सर्वाधिक महत्त्वाचे मानले जातात. या संमेलनात हे विचारधनच मिळणार नसल्याने रसिक नाराज झाले आहेत. संमेलन हे केवळ औपचारिकता म्हणून उरकले जात आहे का, अशी शंकाही काही जणांनी व्यक्त केली आहे.