जिल्हाधिकाऱ्यांनी तंबी देताच बाजार समितीत गर्दी नियंत्रणासाठी उपाययोजना

सामाजिक अंतर आणि बऱ्याच जणांनी मास्क लावलेले नसते, तसेच नाशिक शहरात जागोजागी भरणाऱ्या भाजी बाजारातील भरेकरीदेखील बाजार समितीतून पालेभाज्या व फळभाज्या घेऊन जात असतात. बाजार समितीत होणाऱ्या गर्दीविषयी जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार तक्रारी जात होत्या. म्हणून जिल्हाधिकारी मांढरे यांनी सभापती पिंगळे यांना फोन करून गर्दी नियंत्रणासाठी योग्य कारवाई न केल्यास कोरोनाचा समूळ नायनाट होईपर्यंत बाजार समिती बंद करावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला होता.

    नाशिक : कृषी बाजार समितीमध्ये ठिकठिकाणांवरून भाजीपाला खरेदी-विक्रीसाठी येणाऱ्या व्यापारी आणि शेतकरी यांच्यामुळे होणाऱ्या गर्दीच्या तक्रारी प्रशासनाकडे जात होत्या. त्यामुळे बाजार समिती प्रशासनाने कठोर पावलं उचलली आहेत. त्यात सामाजिक अंतर, मास्क वापर तसेच बाजार घटका व्यतिरिक्त प्रवेशबंदी केली आहे. समितीच्या गेटवर सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

    गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाययोजना केल्या असल्याची माहिती देवीदास पिंगळे यांनी दिली. नाशिकसह अवघ्या महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्ह्याची मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी जिल्हाभरातून फळभाज्या, पालेभाज्या, कांदा-बटाटा असा माल घेऊन दररोज हजारो शेतकरी येत असतात. तसेच, काही मुंबईचे व्यापारीही बाजार समितीत येत असतात. शेतकरी, हमाल-मापारी आदी वर्गाचीही मोठी गर्दी होत असते.

    यावेळी सामाजिक अंतर आणि बऱ्याच जणांनी मास्क लावलेले नसते, तसेच नाशिक शहरात जागोजागी भरणाऱ्या भाजी बाजारातील भरेकरीदेखील बाजार समितीतून पालेभाज्या व फळभाज्या घेऊन जात असतात. बाजार समितीत होणाऱ्या गर्दीविषयी जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार तक्रारी जात होत्या. म्हणून जिल्हाधिकारी मांढरे यांनी सभापती पिंगळे यांना फोन करून गर्दी नियंत्रणासाठी योग्य कारवाई न केल्यास कोरोनाचा समूळ नायनाट होईपर्यंत बाजार समिती बंद करावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला होता.सभापती देवीदास पिंगळे यांनीही तातडीने बाजार समिती प्रशासनाला खबरदारीच्या सूचना देत कठोर पावले उचलली.बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावर सिक्युरिटी गार्ड नेमणूक करत आवारात शेतकरी, व्यापारी, मापारी व हमाल यांना ‘नो मास्क नो एण्ट्री’ हा नियम कडक केला आणि या घटकाव्यतिरिक्त इतरांना प्रवेश बंदी घातली आहे.भाजीपाला व फळभाज्या घेऊन येणारी एक गाडी एक शेतकरी यावे अशी माहिती देण्यात येत आहे. ध्वनीक्षेपकाद्वारे सामाजिक अंतर ठेवा ,मास्क वापरा,विनाकारण जात वेळ थांबू नका असे वेळोवेळी अनाउन्सिंग केले जात आहे.गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी सचिव अरुण काळे, स्वच्छता निरीक्षक रवींद्र तुपे व सुरक्षा रक्षक यांनी सिक्युरिटी गार्ड उपाययोजनां संदर्भात सभापती पिंगळे यांनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करून घेतली आहे.