मनसेतर्फे साहित्य संमेलनाच्या आयाेजकांचा निषेध ; स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख टाळला

नाशिकचे भूमिपुत्र असणाऱ्या स्वातंत्र्यवीरांचा हा अपमान मनसे कधीही सहन करणार नाही, असेही मनसेने म्हटले अाहे. दरम्यान आपले आदर्श आणि अस्मिता ह्यांच्याशी मनसे कधीही तडजोड करणार नाही. मनसेने यानिमित्त सर्वपक्षीयांनी आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकून या घटनेचा जाहीर निषेध करावा तसेच साहित्य संमेलन नगरीला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव द्यावे, यासाठी आग्रही भूमिका घ्यावी.

    नाशिक : ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या गिताचे नुकतेच पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. मात्र या गितात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख टाळल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने साहित्य संमेलन आयोजकांचा निषेध केला आहे. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित हाेते.

    राष्ट्रभक्तांचा अवमान
    स्वातंत्र्यवीर सावरकरांना हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य समारातील मेरुमणी समजले जाते. १९३८ साली मुंबई येथे झालेल्या २३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे नाशिकचे भूमिपुत्र असून, त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील आणि मराठी साहित्यात अमूल्य योगदान अमूल्य आहे. साहित्य संमेलनात गायल्या गीतामध्ये अनेकांचा उल्लेख आठवणीने झाला असताना क्रांती आणि साहित्याचे अग्रदूत असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना अनुल्लेखाने टाळून आयोजकांनी समस्त नाशिककर किंबहूना सर्वच राष्ट्रभक्त्ताचा जाणूनबूजून अपमानच केल्याचा आराेप मनसेने केला आहे.

    बाेटचेपी भूमिका
    साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी केलेली चूक त्वरित सुधारावी तसेच साहित्य संमेलनाच्या नगरीला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देऊन स्वातंत्र्यवीरांचा यथोचित सन्मान करावा, अशी आग्रही मागणीदेखील मनसेतर्फे करण्यात आली आहे. खरेतर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाचा निषेध प्रत्येक राजकीय पक्षाने करणे अपेक्षित आहे आणि हा राजकीय विषय नसून साहित्यिक आणि राष्ट्रभक्तांच्या अस्मितेचा विषय आहे. बदललेल्या राजकीय परिस्थिती आणि भूमिकांमुळे राजकीय पक्षांची बोटचेपी भूमिका यामुळे लोकांसमोर येत आहे.

    स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव द्या
    नाशिकचे भूमिपुत्र असणाऱ्या स्वातंत्र्यवीरांचा हा अपमान मनसे कधीही सहन करणार नाही, असेही मनसेने म्हटले अाहे. दरम्यान आपले आदर्श आणि अस्मिता ह्यांच्याशी मनसे कधीही तडजोड करणार नाही. मनसेने यानिमित्त सर्वपक्षीयांनी आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकून या घटनेचा जाहीर निषेध करावा तसेच साहित्य संमेलन नगरीला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव द्यावे, यासाठी आग्रही भूमिका घ्यावी.

    यांची उपस्थिती
    याप्रसंगी नाशिक जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, नाशिक शहराध्यक्ष दिलीप दातीर, सचिव व प्रवक्ते पराग शिंत्रे, उपजिल्हाध्यक्ष मनोज घोडके, विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे, भाऊसाहेब निमसे, राकेश परदेशी, धीरज भोसले, संदीप भवर, विजय आगळे, चिन्मय देशपांडे, प्रफुल्ल बनबैरू, वैभव रौदळ, शहेबाज काजी, किरण शिंदे, योगेश पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.