अल्पवयीन मुलीचा विनयभंग; कलाशिक्षकास ४ वर्षे सक्तमजुरी

पिडीत अल्पवयीन मलगी चित्रकलेच्या क्लाससाठी फावडे लेन येथे जात होती. २६ ते २८ जुलै २०१६ दरम्यान,आरोपी भालेराव याने पीडितेचा अभ्यास करुन घेण्याच्या बहाण्याने विनयभंग केला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात विनयभंगासह पोक्सोसह गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    नाशिक : चित्रकलेचा अभ्यास करुन घेण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणा-या कलाशिक्षकास जिल्हा व सत्र न्यायालयाने ४ वर्ष सक्तमजुरी व १० हजार रुपयांची शिक्षा सुनावली. ही घटना शहरातील फायडे लेन भागात घडली होती. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चंद्रकांत वामन भालेराव (६९, रा. सुरारा कॉम्प्लेक्स, फावडे लेन) असे आरोपीचे नाव आहे.

    पिडीत अल्पवयीन मलगी चित्रकलेच्या क्लाससाठी फावडे लेन येथे जात होती. २६ ते २८ जुलै २०१६ दरम्यान,आरोपी भालेराव याने पीडितेचा अभ्यास करुन घेण्याच्या बहाण्याने विनयभंग केला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात विनयभंगासह पोक्सोसह गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे आर. एम. कोतवाल यांनी युक्तीवाद केला. त्यानुसार प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. नायर यांनी आरोपी भालेराव यास चार वर्ष सक्तमजूरी व दंड ठोठावला आहे. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार ए. एस. पवार यांनी कामकाज पाहिले.