रेल्वे गाड्यांचा थांबा रद्द केल्यास आंदोलन : आ. कांदे

नांदगाव : रेल्वे प्रशासनाची मनमानी थांबता थांबेना याचा प्रत्यय नांदगावसह संपूर्ण तालुक्यातील नागरिकांना येत असून त्यांच्यासाठी हक्काच्या असलेली काशी एक्स्प्रेस, महानगरी एक्स्प्रेस, कामायनी एक्स्प्रेस आणि झेलम एक्स्प्रेस या चार गाड्या पाठोपाठ आता जानेवारीपासून कुशीनगर एक्स्प्रेसचा देखील थांबा रद्द करण्यात आला आहे.

नांदगाव : रेल्वे प्रशासनाची मनमानी थांबता थांबेना याचा प्रत्यय नांदगावसह संपूर्ण तालुक्यातील नागरिकांना येत असून त्यांच्यासाठी हक्काच्या असलेली काशी एक्स्प्रेस, महानगरी एक्स्प्रेस, कामायनी एक्स्प्रेस आणि झेलम एक्स्प्रेस या चार गाड्या पाठोपाठ आता जानेवारीपासून कुशीनगर एक्स्प्रेसचा देखील थांबा रद्द करण्यात आला आहे. एकाच वेळी पांच गाड्यांचा थांबा रद्द करण्यात आल्याचे पाहून या भागातील प्रवासी,चाकरमाने आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. रद्द करण्यात आलेल्या गाड्यांचा थांबा पूर्ववत करण्यात यावा, अशी मागणी आमदार सुहास कांदे यांनी केली. अन्यथा रेल्वे प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.

या गाड्यांचा थांबा रद्द झाला
नांदगाव तालुक्यात १०५ गावांचा समावेश असून तब्बल अडीच लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या या तालुक्याची आहे या सर्वासाठी प्रवास आणि वाहतुकीचे सर्वात स्वस्त साधन रेल्वे आहे. नांदगाव रेल्वे स्थानकावर मुंबई वाराणसी काशी एक्स्प्रेस, मुंबई, वाराणसी, महानगरी एक्स्प्रेस, कामायनी एक्स्प्रेस, पुणे-अमृतसर झेलम एक्स्प्रेस, कुशीनगर एक्स्प्रेस, मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस, कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस मुंबई-भुसावळ, मुंबई-नाशिक पॅसेंजर आदी ९ गाड्यांना थांबा होता. मात्र आता त्यातून ५ गाड्यांचा थांबा रद्द करण्यात आला. त्यामुळे नांदगाव शहरासोबत ग्रामीण भागातील चाकरमाने व सर्वसामान्य प्रवाशासाठी फक्त उरल्या ४ गाड्या त्यापैकी दोन्ही पॅसेंजर या कोरोनामुळे गेल्या ९ महिन्यांपासून बंद असून, प्रवासासाठी फक्त दोन गाड्या आहेत त्यापैकी महाराष्ट्र एक्स्प्रेस ही नाशिक, मुंबईकडे जात नाही उरली फक्त सेवाग्राम एक्स्प्रेस ही गाडी मुंबईला जाण्यासाठी सकाळी येते तर भुसावळकडे जाण्यासाठी रात्री येते. रेल्वे प्रशासनाने दिवसा असलेल्या सर्व गाड्यांचे थांबे रद्द केल्यामुळे प्रवास करावा तरी कसा? असा प्रश्न नांदगाव शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनतेला पडला आहे. रेल्वे प्रशानाने ज्या गाड्यांचे थांबे रद्द केले तातडीने सुरु करावे, अशी मागणी आमदार सुहास कांदे यांनी केली अन्यथा रेल्वे प्रशासनाविरुद्ध शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.