संभाव्य काेविड सेंटर मुक्तीधाममधील भक्तनिवासाची मनपा आयुक्तांकडून पाहणी

शहर-जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जवळपास राेजच २००० पेक्षा अधिक काेराेनाबाधित आढळून येत आहेत. काेराेनाच्या सुरूवातीच्या काळातही काेराेनाबाधितांच्या वाढीचा वेग एवढा नव्हता. त्यामुळे महापािलका प्रशासन तसेच जिल्हा प्रशासन अधिक सतर्क झाले असून, परिस्थिती कितीही गंभीर झाली तरी प्रशासन कमी पडायला नकाे, यादृष्टीने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

    नाशिक : शहर-जिल्ह्यात दिवसेंदिवस काेराेनाचा कहर वाढत असताना महापालिका आयुक्तांनी परिस्थिती आणखी गंभीर झाली तर काय व्यवस्था करायची, याची चाचपणी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज आयुक्त कैलास जाधव यांनी मुक्तीधाममधील भक्त निवासाची पाहणी केली. भविष्यात परिसि्थती आणखी बिकट झाली तर रुग्णांना बेड कमी पडू नये म्हणून महापािलकेने आतापासूनच पर्यायी जागांची तयारी सुरू केली आहे.

    मनपा आयुक्तांनी आज मुक्तिधाममधील गोवर्धन भक्त निवास, अयोध्या भवन व गोकुळ भवन या तीन इमारतींची पाहणी करून त्या ठिकाणी महापािलकेस आवश्यकता भासेल त्यावेळी रुग्णांसाठी टप्प्याटप्प्याने या इमारतीमध्ये व्यवस्था करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना संबंधित विभागास त्यांनी दिल्या.

    यावेळी आयुक्त कैलास जाधव, कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, विभागीय अधिकारी डॉ. दिलीप मेनकर, कोरोना कक्ष अधिकारी डॉ. आवेश पलोड, डॉ. जितेंद्र धनेश्वर, उपअभियंता निलेश साळी, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी यांनी पाहणी करून मुक्तिधामचे ट्रस्टी नटवरलाल चव्हाण व जगदीश चव्हाण यांच्याशी चर्चा केली.

    वाढत्या बाधितांनी चिंता वाढली