मनपा आयुक्त कैलास जाधव होम क्वारंटाईन; प्रशासनाची चिंता वाढली

नाशिक येथे गेल्या आठवड्यात मनपाच्या आरोग्य विभागाचे अधिकारी काेराेनाबाधित झाल्यामुळे क्वारंटाईन झाले तर आज महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांच्या पत्नी काेराेेनाबाधित झाल्याने आयुक्त होम क्वारंटाईन झाले आहेत.

    नाशिक (Nashik).  गेल्या आठवड्यात मनपाच्या आरोग्य विभागाचे अधिकारी काेराेनाबाधित झाल्यामुळे क्वारंटाईन झाले तर आज महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांच्या पत्नी काेराेेनाबाधित झाल्याने आयुक्त होम क्वारंटाईन झाले आहेत. ते पुढील काही दिवस घरून काम करणार आहेत.

    महापालिकेचे आयुक्त जाधव यांच्या पत्नी करोना बाधित आढळून आल्या आहेत. यामुळे जाधव पुढील काही दिवस घरून काम करणार असल्याचे आहेत. शहरात काेेराेनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ हाेत असताना अधिकारीवर्गच काेराेनाच्या विळख्यात अडकत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.  या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरातील काेराेनाची परिस्थितीचे वेळोवेळी माहिती घेऊन निर्णय घेणारे आयुक्तच आता घरून काम करणार असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी आधीच करोनाबाधित झाल्यामुळे करोनाचा अधिक वाईट परिणाम सध्या महापालिकेला सोसावा लागत असल्याचे चित्र आहे.