sahitya sammelan

मराठी साहित्य संमेलन आणि वाद-विवाद यांचे जवळचे नाते आहे. दरवर्षी साहित्य संमेलन कोणत्यातरी वादात निश्चितच सापडले आहे. यंदाही म्हणजे व्हिडिओ चोरीच्या आरोपामुळे संमेलन चर्चित आहे. नाशिकमधील एका ट्रॅव्हल ब्लॉगरने त्याचे व्हिडीओ न विचारता वापरल्याचा आरोप संमेलनाच्या आयोजकांवर केला आहे(Nashik: Accused of stealing the theme song of Sahitya Sammelan; Allegations of tampering with a live video from a YouTube channel). यामुळे पुन्हा एकदा संमेलनाला वाङ्मयचौर्याचे ग्रहण लागले आहे.

    नाशिक : मराठी साहित्य संमेलन आणि वाद-विवाद यांचे जवळचे नाते आहे. दरवर्षी साहित्य संमेलन कोणत्यातरी वादात निश्चितच सापडले आहे. यंदाही म्हणजे व्हिडिओ चोरीच्या आरोपामुळे संमेलन चर्चित आहे. नाशिकमधील एका ट्रॅव्हल ब्लॉगरने त्याचे व्हिडीओ न विचारता वापरल्याचा आरोप संमेलनाच्या आयोजकांवर केला आहे(Nashik: Accused of stealing the theme song of Sahitya Sammelan; Allegations of tampering with a live video from a YouTube channel). यामुळे पुन्हा एकदा संमेलनाला वाङ्मयचौर्याचे ग्रहण लागले आहे.

    94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या 3, 4 आणि 5 डिसेंबरला नाशिकमध्ये पार पडत आहे. यावर्षी नाशिक शहरातील आडगावच्या कुसुमाग्रज नगरी, भुजबळ नॉलेज सिटीमध्ये साहित्यिकांची मांदियाळी दिसेल. पालकमंत्री छगन भुजबळ हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष असतील. तर, यंदा अध्यक्षपदाचा मान जयंत नारळीकरांना दिला आहे.

    थीम साँग चोरल्याचा आरोप

    संमेलनाच्या थिम साँगचा व्हिडीओ प्रसारित झाला आहे. यामध्ये नाशिक शहरासंदर्भात वापरण्यात आलेले व्हिडीओ एका अन्य युट्युब चॅनेलवरून थेट उचलण्यात आले आहेत. काही व्हिडीओशी छेडछाड केल्याचा आरोप मूळ मालकांनी केला आहे. तसेच कोणतंही सौजन्य न देता, कोणत्याही प्रकारे अधिकृत परवानगी न घेता हे व्हिडीओ वापरण्यात आल्याचा आरोप सुशील अहिरे यांनी केला. यासोबतच व्हिडीओत वापरण्यात आलेला लोगो त्यांच्या युट्युब चॅनेलचा असल्याचेही त्यांनी सांगितले. हे व्हिज्युअल्स मागे घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.