नाशिक शहर लाॅकडाऊनच्या दिशेने; आयुक्तांचा निर्वाळा

महापालिकेत खळबळ : वैद्यकीय अधिक्षक डाॅ. नागरगाेजे, डाॅ. पलाेड काेराेनाबाधित

    नाशिक : शहरातील काेराेना परिसि्थती नियंत्रणात आणण्यासाठी फ्रंट लाईनवर काम करणारे महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. आवेश पलोड यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने महापालिकेत एकच खळबळ उडाली आहे. आता त्यांचा कार्यभार डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच पालिकेची वैद्यकीय विभागातील सहाय्यक वैद्यकीय अधिकार्‍यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

    महापािलकेचे मुख्यालय काेराेेनाच्या विळख्यात सापडले आहे. येथे सातत्याने अभ्यागतांची वर्दळ हाेत असते. काही दिवसांपूर्वीच मनपा मुख्यालयात काेणतेही लक्षण नसणारे १४ काेराेनाबाधित आढळून आले हाेते. आता तर महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक आणि वैद्यकीय अधिकारीच काेराेेनाबाधित आढळल्याने मनपा आयुक्तांचे टेन्शन वाढले आहे.

    गेल्या दाेेन दिवसांपासून महापािलकेत आराेग्य विभागातील भरतीकामी मुलाखतीही सुरू हाेेत्या. या मुलाखतींदरम्यान वैद्यकीय अधीक्षक डाॅ. बापूसाहेब नागरगाेजे हे उपस्थित हाेते. आता मनपातील सर्वच अधिकारी व कर्मचार्‍यांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. नागरिकांशी संपर्कात असणारे महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, सुरक्षारक्षक, सफाई कर्मचारी यांना आरटी-पीसीआर करणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार १५ मार्चपासून महापालिकेत अधिकारी, कर्मचारी व सुरक्षारक्षकांची आरटी-पीसीआर चाचणी केली जात आहे. शनिवारपर्यंत १९९ अधिकारी, कर्मचारी व सुरक्षारक्षकांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली. त्यापैकी १४ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात एका सहायक वैद्यकीय अधिकार्‍यासह काही कर्मचारी व अधिकार्‍यांचे वाहनचालक यांचा समावेश आहे.

    शहरातील करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने करोना नियंत्रणाचे मोठे आव्हान वैद्यकीय विभागासमोर उभे ठाकले आहे. त्यासाठी वैद्यकीय विभागातील अधिकारी, डॉक्टर दिवस-रात्र कार्यरत असतानाच आता वैद्यकीय अधीक्षक, अधिकारी, सहायक वैद्यकीय अधिकारी यांचा अहवालदेखील पॉझिटिव्ह आल्याने वैद्यकीय विभागाला धक्का बसला आहे. शहरातील करोना नियंत्रणासाठीच्या उपाययोजनांची जबाबदारी सध्या या वैद्यकीय अधिकार्‍याकडे आहे. मुख्य वैद्यकीय अधिकार्‍यांसह अन्य वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांच्या संपर्कात हा अधिकारी आल्याने वैद्यकीय विभागाचे टेन्शन वाढले आहे. संबंधित अधिकार्‍यास लक्षणे नसली, तरी ते सध्या होमक्वारंटाइन झाले आहेत.