नाशिक गारठलं… पारा ७.३ अंशापर्यत खाली, पुढच्या दोन दिवसांत थंडीत वाढ होण्याची शक्यता

नाशिक शहरात शनिवारी दिवसभर ढग दाटून आलेले होते. संध्याकाळी व रात्री बेमोसमी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रविवारी संधकाळपासून अचानकपणे थंडीची तीव्रता वाढली. किमान तापमान वेगाने खाली आले आणि सोमवारी पहाटेपर्यंत ७.३ अंश सेल्सिअस इतकी नीचांकी नोंद झाली. शनिवारी झालेल्या बेमोसमी पावसानंतर वातावरणात अधिक गारवा निर्माण झाला आणि नाशिककरांना हुडहुडी भरली.

    नाशिक : गेल्या २४ तासांत मुंबई, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तापमानात घट झाली आहे. नाशिकमध्ये ७.३ टक्के, तर निफाडमध्ये राज्यातील सर्वात निचांकी तापमान ६.१ डिग्रीची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना हुडहुडी भरली होती. येत्या दोन दिवसांत आणखी थंडी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिल आहे.

    नाशिक शहरात शनिवारी दिवसभर ढग दाटून आलेले होते. संध्याकाळी व रात्री बेमोसमी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रविवारी संधकाळपासून अचानकपणे थंडीची तीव्रता वाढली. किमान तापमान वेगाने खाली आले आणि सोमवारी पहाटेपर्यंत ७.३ अंश सेल्सिअस इतकी नीचांकी नोंद झाली. शनिवारी झालेल्या बेमोसमी पावसानंतर वातावरणात अधिक गारवा निर्माण झाला आणि नाशिककरांना हुडहुडी भरली.

    उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि पालघर, मुंबईतील वातावारणात थंडावा जाणवेल. विदर्भात अद्यापही ढगाळ वातावरण असल्यामुळे तिकडे थंडीचा पाऱ्यात घसरण होण्यास थोडा वेळ लागेल. सातारा आणि महाबळेश्वरमध्ये कडाक्याची थंडी पडली असल्यामुळे पर्यटकांना गुलाबी थंडीचा अनुभव आला आहे. मुंबईत रविवारी सांताक्रूझमध्ये २६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हे तापमान दुसऱ्यांदा नोंदवण्यात आले असून पहिल्यांदा २०१५ मध्ये सर्वाधिक कमी २५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद जानेवारी महिन्यात करण्यात आली होती.

    दरम्यान, येत्या दोन ते तीन दिवसांत मध्य महाराष्ट्रात तापमान २-३ अंशाने खाली उतरणार आहे. त्यामुळे काही भागात थंडीचं प्रमाण वाढणार असून नागरिकांना आणखी बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागू शकतो.