चाेरट्यांचा नवा धंदा ; शहरातून बाेकडचाेरीचा सपाटा

काेराेनाचा संसर्ग वाढू लागल्याने बाजारपेठेतील अार्थिक व्यवहार सध्या मंदावले आहेत. बेराेजगारीतही काही प्रमाणात वाढ झाल्याने आता बाेकड चाेरीचा नवीन व्यवसाय चाेरट्यांनी सुरू केल्याची चर्चा यानिमित्ताने शहरात सुरू झाली आहे.

    नाशिक : सातपूर मार्केटमधील बागलाण मटण शॉपचे शेडचे कुलूप तोडून बोकड चोरीची घटना ताजी असतानाच अंबड परिसरातून २१ बाेकड चाेरीस गेल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

    नवीन नाशिकमधील राणेनगर परिसरातील जावेद गनी खाटीक यांनी याप्रकरणी पाेिलसांत तक्रार दिली आहे. खाटीक यांचे अंबड परिसरात जावेद मटन शाॅप असून, रात्री ते आपले दुकान बंद करून घरी गेल्यानंतर अज्ञात चाेरट्यांनी आत असलेले दाेन लाख रुपये किंमतीचे २१ बाेकड चाेरून नेल्याचे म्हटले आहे.

    काेराेनाचा संसर्ग वाढू लागल्याने बाजारपेठेतील आर्थिक व्यवहार सध्या मंदावले आहेत. बेराेजगारीतही काही प्रमाणात वाढ झाल्याने आता बाेकड चाेरीचा नवीन व्यवसाय चाेरट्यांनी सुरू केल्याची चर्चा यानिमित्ताने शहरात सुरू झाली आहे.