children infected with corona

गेल्या वर्षी आलेल्या कोरोनाची बाधा लहान मुलांना होत नव्हती. लहान मुलांची रोग प्रतिकारक शक्ती चांगली असल्यामुळे लहान मुलांना कोरोना होण्याचं प्रमाण नगण्य होतं. मात्र आता आलेल्या नव्या स्ट्रेनमुळे लहान मुलांनाही कोरोना होत असल्याचं दिसून आलंय. नाशिक महानगपालिकेत करण्यात आलेल्या नोंदीनुसार आता लहान मुलांमध्येही कोरोनाची लक्षणं दिसायला सुरुवात झाली असून कोरोना रुग्णांमध्ये लहान मुलांची संख्या वाढू लागलीय. 

    गेल्या वर्षी जगात दाखल झालेल्या कोरोनाने जगभर आपला धुमाकूळ आजही सुरूच ठेवलाय. अत्यंत अनप्रडिक्टेबल आजार असं आता कोरोनाचं वर्णन केलं जातं. कोरोनाचा स्ट्रेन जसा बदललाय, तसाच कोरोनाची लागण होणाऱ्यांचा प्रकारदेखील बदलत चाललाय.

    गेल्या वर्षी आलेल्या कोरोनाची बाधा लहान मुलांना होत नव्हती. लहान मुलांची रोग प्रतिकारक शक्ती चांगली असल्यामुळे लहान मुलांना कोरोना होण्याचं प्रमाण नगण्य होतं. मात्र आता आलेल्या नव्या स्ट्रेनमुळे लहान मुलांनाही कोरोना होत असल्याचं दिसून आलंय. नाशिक महानगपालिकेत करण्यात आलेल्या नोंदीनुसार आता लहान मुलांमध्येही कोरोनाची लक्षणं दिसायला सुरुवात झाली असून कोरोना रुग्णांमध्ये लहान मुलांची संख्या वाढू लागलीय.

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एकूण बाधितांपैकी २० टक्के संख्या ही लहान मुलांची असल्याचं नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागानं म्हटलंय. गेल्या वर्षी कोरोनाबाधितांमध्ये सर्वाधिक संख्या ही वृद्धांची आणि कुठला ना कुठला इतर आजार असल्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता कमी असणाऱ्या व्यक्तींची असायची. मात्र गेल्या काही दिवसांपासून तरुणांमध्ये कोरोनाचं प्रमाण वाढत असल्याचं चित्र आहे. त्याचप्रमाणे लहान मुलांनाही कोरोनाचा हा नवा स्ट्रेन लक्ष्य करत असल्याचं दिसून आलंय.

    लहान मुलांना होणारा कोरोना हा त्यांच्या मेंदूवर आणि हृदयावर आघात करत असल्याचं दिसून आलंय. त्यामुळं यावेळी लहान मुलांची विशेष काळजी घेणं गरजेचं असल्याचं सांगण्यात आलंय. पगर्दीत न जाणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, वारंवार हात धुणे, हँड सॅनिटायझरचा वापर करणे, मास्कचा वापर करणे, हे उपाय करून कोरोनाचा फैलाव रोखणे गरजेचे आहे.