साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीत कोरोनाच्या नियमांना हरताळ, ५०० मुलांसह, पोलीस, अधिकारीही विनामास्क

ओमायक्रॉनच्या (Omicron) पार्श्वभूमीवर साहित्य संमेलनात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची काटेकोर अंमलबजावणी अपेक्षित होती. मात्र जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांसमोरच हे सर्व सुरु होते. या दिंडीत सहभागी असलेले अनेक पोलीस आणि अधिकारीही विनामास्क (Without Mask) फिरत होते.

  कुसुमाग्रजनगरी, नाशिक : ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (94th Marathi Sahitya Sammelan, Nashik) ग्रथंदिंडीत (Granthdindi) कोरोनाच्या नियमांना हरताळ (Not Follow The Corona Rules) फासल्याचे पाहायला मिळाले. मोठ्या उत्साहात सकाळी आठ वाजता कुसुमाग्रजांच्या निवासस्थानावरुन सुरु झालेल्या या ग्रंथ दिंडीत सुमारे १२०० जणांनी सहभाग घेतला होता. यात ५०० लहान मुले, विद्यार्थीही सहभागी झाले होते. मात्र त्यापैकी फार थोड्या जणांनी मास्क (Mask) परिधान केला होता.

  ओमायक्रॉनच्या (Omicron) पार्श्वभूमीवर साहित्य संमेलनात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची काटेकोर अंमलबजावणी अपेक्षित होती. मात्र जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांसमोरच हे सर्व सुरु होते. या दिंडीत सहभागी असलेले अनेक पोलीस आणि अधिकारीही विनामास्क (Without Mask) फिरत होते.

  ग्रंथदिंडीत सुमारे १२०० जण सहभागी झाले होते, मात्र त्यापैकी फारच कमी जण हे कोरोना प्रतिबंधक नियमांबाबत जागृत असल्याचे दिसले.

  ग्रंथदिडींचा मार्ग

  टिळकवाडीतून कुसुमाग्रज निवासस्थानावरुन सुरु झालेली ही ग्रंथदिंडी

  महापौर बंगल्यावरुन रेमंड सिग्नलला उजवीकडे वळली. त्यानंतर जुना सीबीएस सिग्नल ओलांडून डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावरुन ती शिवाजी रोडवर आली. तिथून नाशिक जिमखाना, सागरमल मोदी शाळा, सारडा कन्या शाळा, परशुराम सायखेडकर नाट्यगृह वरून सार्वजनिक वाचनालय येथे या दिंडीने विसावा घेतला. त्यानंतर बसने ही दिंडी संमेलनस्थळी रवाना झाली. यात सहभागी झालेले हेमंत टकले यांनी दिंडीसोबत जाण्याचे टाळत, स्वत:च्या चारचाकी गाडीतून संमेलनस्थळी प्रयाण केले.

  महापौर सतीश कुलकर्णी यांची नाराजी कायम

  ग्रंथदिंडी सकाळी आठ वाजता सुरु झाली मात्र महापौर पावणे नऊच्या सुमारास या दिंडीत सहभागी झाले. त्यावरुन त्यांची नाराजी अद्यापही कायम आहे की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ही ग्रंथदिंडी महापौर बंगल्यावरुन पुढे गेली, मात्र तिथेही दिंडीतील सहभागी होणाऱ्यांसाठी साधी पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली नव्हती.