केंद्राच्या निर्णयाचा फटका; बाजार उघडताच कांद्याचे हाेणार वांदे?

अशातच केंद्र सरकारने (Central Government) देशांतर्गत कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी (To Control The Market Price Of Domestic Onion) नाफेडच्या (Nafed) माध्यमातून एक लाख ८५ हजार मेट्रिक टन कांदा खरेदी केला होता ह्यातून बंपर साठ्यामधील एक लाख पंधरा हजार मेट्रिक टन कांदा देशांतर्गत खुल्या बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे.

    उमेश पारीक, लासलगाव :

    दिवाळी आणि साप्ताहिक सुट्ट्यानिमित्त गेल्या नऊ दिवसांपासून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत (Lasalgaon Agricultural Produce Market Committee) कांदा (Onion) तर पाच दिवसांपासून धान्याचे लिलाव बंद (Grains Auction Closed) ठेवण्यात आले होते; मात्र आज सोमवारी धान्याचे तर मंगळवारी कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू होणार आहेत.

    अशातच केंद्र सरकारने (Central Government) देशांतर्गत कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी (To Control The Market Price Of Domestic Onion) नाफेडच्या (Nafed) माध्यमातून एक लाख ८५ हजार मेट्रिक टन कांदा खरेदी केला होता ह्यातून बंपर साठ्यामधील एक लाख पंधरा हजार मेट्रिक टन कांदा देशांतर्गत खुल्या बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात दुष्काळात तेरावा महिना म्हणावा या म्हणीप्रमाणे इराण येथून २४ कंटेनरमधून इराणचा कांदा मुंबईच्या पोर्टवर दाखल झाल्याने कांद्याच्या बाजारभावात घसरण होणार किंवा वाढ होणार? याकडे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

    कोट्यवधीचे व्यवहार ठप्प

    नाशिक जिल्ह्यात दररोज पंचवीस ते तीस कोटी रुपयांची शेतीमालाच्या लिलावातून उलाढाल होत असते गेल्या नऊ दिवसांपासून कांद्याचे तर धान्याचे पाच दिवसांपासून लिलाव बंद राहील दोनशे ते अडीचशे कोटी रुपयांची शेतीमालाच्या लिलावातून उलाढाल ठप्प झाली

    शेतकऱ्यांचे नुकसान

    ऑक्टोबर महिन्यात झालेल्या जोरदार ते अतिवृष्टी पावसामुळे शेतातील उभ्या पिकाचे मोठे नुकसान झाले तर चाळीत साठवलेला कांदा सडल्याने उखड्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्याने झालेला उत्पादन खर्च वाया गेल्यामुळे हजार ते लाखो शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले.

    कांद्याचे वांदे?

    पाच राज्यांमधील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने पेट्रोल नंतर आता कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी नाफेड मार्फत खरेदी केलेल्या कांद्याचा बंपर साठा देशांतर्गत आणण्यास सुरुवात केली असताना आयातदार व्यापाऱ्यांच्या माध्यमातून इराण येथून चोवीस कंटेनरमधून कांदा मुंबईत दाखल झाला आहे मंगळवारी बाजार समित्या सुरू झाल्यास काय बाजार भावाने कांदा खरेदी करावा असा प्रश्न आता स्थानिक बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचा समोर उभा राहिला आहे यामुळे आता कांद्याचे वांदे होणार यात तिळमात्र शंका नाही पण शेतकऱ्यांनी जर आपला कांदा हा टप्प्याटप्प्याने बाजार समितीत विक्रीस आणल्यास या घसरणीला ब्रेक लावण्यास मदत होईल असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञ जयदत्त होळकर व्यक्त केले.

    तीव्र आंदोलनाचा इशारा

    कांद्याच्या बाजार भावात घसरण होत असताना केंद्र सरकारने पोट निवडणुकीत झालेल्या पराभवाचा धसका घेत कांद्याचे बाजार भाव हजार रुपयापर्यंत आणण्यासाठी बाहेरच्या देशातून कांदा आयात करणे नाफेडमार्फत खरेदी केलेल्या कांद्यातून बंपर स्टॉक देशांतर्गत आणण्याच्या निर्णयाचा निषेध केला असून, शेतकऱ्यांनी गर्दी न करता आपला कांदा हा टप्प्याटप्प्याने बाजार समितीत विक्रीसाठी आणावा, असे आव्हान करत बाजार समित्या मंगळवारी सुरू झाल्यानंतर कांद्याच्या बाजारभावात घसरण झाल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिला.

    केंद्राच्या निर्णयाचा फटका?

    चार महिने पोटाच्या पोराप्रमाणे कांद्याचे पीक घेतले दोन रुपये मिळतील या अपेक्षेने कांदा चाळीत साठवला कुठेतरी कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असताना केंद्र सरकारने आयात-निर्यात धोरणात बदल करून कांदा विदेशातून आयात करण्याचा निर्णय घेतला आणि खरेदी केलेला कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात आणण्याचा घाट घातल्यामुळे उत्पादन खर्च आणि अतिवृष्टी पावसामुळे झालेली नुकसान याचा जर विचार केला तर आज मिळणाऱ्या बाजार भाव आतून उत्पादन खर्चही निघणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे असे मत कांदा उत्पादक शेतकरी निवृत्ती न्याहारकर यांनी व्यक्त केले.