कामगारांच्या राेजगाराचा मार्ग माेकळा ; नासाकाची चाके पुन्हा फिरणार

बाराशे मेटि्रक टन गाळप क्षमता असलेल्या या कारखान्याचे नाशिक, सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यात जवळपास सतरा हजार सभासद आहेत. कारखाना सुरू असताना जिल्हा बॅंकेकडून कारखान्याने काेट्यवधी रूपयांचे कर्ज घेतले हाेते. त्यानंतर कारखाना बंद पडला आणि कर्जाचा डाेंगर वाढत गेला.

    नाशिक : गेल्या सात वर्षांपासून आर्थिक अडचणीमुळे बंद असलेल्या नाशिक सहकारी साखर कारखान्याची चाके पुन्हा फिरण्याचा मार्ग माेकळा झाला आहे. कारखाना पुन्हा सुरू करण्यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत इथेनाॅलच्या उत्पादनासाठी २-३ दिवसांत बॅंकेला काढण्याचे निर्देश जाहिरात देण्यात आले असून, त्यानंतर लवकरात लवकर निविदा प्रक्रिया राबवून हा कारखाना सुरू करण्याच्या सूचना सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्या.

    बाराशे मेटि्रक टन गाळप क्षमता असलेल्या या कारखान्याचे नाशिक, सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यात जवळपास सतरा हजार सभासद आहेत. कारखाना सुरू असताना जिल्हा बॅंकेकडून कारखान्याने काेट्यवधी रूपयांचे कर्ज घेतले हाेते. त्यानंतर कारखाना बंद पडला आणि कर्जाचा डाेंगर वाढत गेला. कर्जाच्या वसुलीसाठी बॅंकेने कारखान्यावर जप्तीही आणली हाेती. या सर्व प्रकारांमुळे कारखान्याचे जवळपास दीडशे कामगार बेराेजगार झाले हाेते. तसेच ऊस उत्पादकांच्या अडचणीही वाढल्या हाेत्या.

    या अडचणींवर मात करण्यासाठी कृउबाचे सभापती देवीदास पिंगळे यांनी अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू केले हाेते. यासाठी काल देवळाली मतदासंघांच्या आमदार सरोज आहिरे, अप्पर मुख्य सचिव सहकार,साखर आयुक्त, प्रादेशिक साखर सह संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकिय संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक जिल्हा सहकारी बँकेचे प्रशासक, िवष्णूपंत गायखे यांना बराेबर घेऊन सहकारमंत्री बाळाासाहेब पाटील यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या चर्चेअंती बाळासाहेब पाटील यांनी बॅंकेला यासंबंधीची प्रकि्रया तत्काळ राबवण्याचे आदेश दिल्याने शेतकऱ्यांसह कामगारांच्या राेजगाराचा प्रश्नही मार्गी लागला आहे.