दहशत पसरविणाऱ्या सराईत तडीपारांची पोलिसांनी काढली धिंड

गेल्या अनेक दिवसापासूनना शिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील त्या गुन्हेगाराविरोधात अनेक तक्रारी येत असल्यने पोलिस त्यांच्या मागावर होते. अखेर पोलिसांनी त्यांना अटक करून परिसरातून धिंड काढली. 

    नाशिक : दोन दिवसापुर्वी अचानक रात्रीच्या वेळेला काही तडीपार सराईतांनी नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत चेहेडी पंपिंग परिसरातल्या संगमेश्वर नगरमध्ये  एका घरात घुसुन तोडफोड केली होती. या प्रकरणी तपास सुरू असताना पोलिसांना त्यांच्या मुसक्या आवळण्यात यश आलं आहे. पोलिसांनी आरोपींना पकडून त्यांची परिसरातून धिंड काढली.

    गेल्या अनेक दिवसापासूनना शिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील त्या गुन्हेगाराविरोधात अनेक तक्रारी येत असल्यने पोलिस त्यांच्या मागावर होते. दोन दिवसापुर्वी अचानक रात्रीच्या वेळेला काही तडीपार सराईतांनी संगमेश्वर नगरमध्ये या काचा फोडून एका घरात जबरदस्तीने प्रवेश करत घरातील वस्तूंची कोयते तलवारीच्या साह्याने तोडफोड करत लाखो रुपयांचे नुकसान केले होते. तसेच परिसरातील एका रिक्षाची देखील काच या गुंडांनी फोडली. या सगळ्या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण होतं. अखेर पोलिसांनी त्यांना अटक करून परिसरातून धिंड काढली.  परिसरात धारदार शस्त्र व कोयत्यांचा नाच करणारे हे सराईत तडीपार आहेत. त्यांच्याविरोधात खून तसेच मारामाऱ्या गावठी कट्टे बाळगणे आर्म्स अॅक्ट सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.