मुख्याध्यापकाने ‘या’ कारणामुळे चक्क चावला शिक्षकाचा अंगठा, नक्की काय घडलं वाचा सविस्तर

एका शाळेतील मुख्याध्यापकानं शाळेत काम करणाऱ्या शिक्षकाचा अंगठा चावला (Principal Bite Teacher For Not Giving Dinner) आहे. यामुळे त्या संबंधित शिक्षकाचा अंगठ्याला मोठी दुखापत झाली आहे. या धक्कादायक प्रकारानंतर पीडित शिक्षकानं येवला पोलीस ठाण्यात (Yeola Police Station) फिर्याद दाखल केली आहे.

    नाशिक : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील येवला येथे एक विचित्र घटना घडली आहे. येथील एका शाळेतील मुख्याध्यापकानं शाळेत काम करणाऱ्या शिक्षकाचा अंगठा चावला (Principal Bite Teacher For Not Giving Dinner) आहे. यामुळे त्या संबंधित शिक्षकाचा अंगठ्याला मोठी दुखापत झाली आहे. या धक्कादायक प्रकारानंतर पीडित शिक्षकानं येवला पोलीस ठाण्यात (Yeola Police Station) फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

    सुरेश अहिरे असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपी अहिरे हा येवला तालुक्यातील नगरसूल येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या एका शाळेत मुख्याध्यापक आहे. तर ब्रम्हचैतन्य राजगुरू असं फिर्यादी शिक्षकाचं नाव आहे. फिर्यादी राजगुरू हे संबंधित शाळेत उपशिक्षक आहेत. आरोपी अहिरे हा विविध कारणं सांगून फिर्यादीकडून पैसे घेत होता. अलीकडेच शाळेच्या कॅटलॉगमध्ये झालेल्या चुका माफ करण्यासाठी आरोपी अहिरे यानं फिर्यादीकडे जेवणाची मागणी केली होती. पण फिर्यादीच्या पगारातून मोठी रक्कम कर्जाचा हफ्ता देण्यासाठी जात होती. त्यामुळे त्यांच्याकडे पैसे उरायचे नाही. अशात मुख्याध्यापकाकडून विविध कारणांवरून पैशांची मागणी केली जात होती. तसेच आरोपीकडून सतत धमकी दिली जात होती, असंही फिर्यादीनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

    घटनेच्या दिवशी म्हणजे १२ जानेवारी रोजी आरोपी अहिरे यानं फिर्यादीला कॅटलॉग घेऊन येवला शहरातील पंचायत समिती परिसरात बोलावलं होतं. याठिकाणी फिर्यादी राजगुरू गेले असता, मुख्याध्याप अहिरे हा आपल्या अन्य एका मित्रासोबत मद्यधुंद अवस्थेत होता. यावेळी आरोपीनं कॅटलॉग पाहिल्यानंतर, त्यामध्ये भरपूर चुका असल्याचं सांगितलं. संबंधित चुका माफ करून घ्यायच्या असतील, तर आम्हाला जेवण सांग अशी मागणी आरोपीनं केली. मात्र उपशिक्षकाने पैसे नसल्याचं  मुख्याध्यापकाला सांगितलं. यावेळी चिडलेल्या मुख्याध्यापकानं रागाच्या भरात फिर्यादीचा डाव्या हाताच्या अंगठ्याला जबरदस्त चावा घेतला आहे. त्यामुळे शिक्षक राजगुरू यांचा अंगठा रक्तबंबाळ झाला. या धक्कादायक प्रकारानंतर राजगुरू यांनी येवला पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.