पोलिसांना आपल्या खबऱ्या मार्फत या बंगल्यात रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या पार्टीत दहा पुरुष आणि 12 महिलांचा समावेश होता. 12 महिलांपैकी 4 महिला या फिल्म इंडस्ट्रीत काम करणाऱ्या आहेत. यावेळी पोलिसांनी घटनास्थळहून कॅमेरा, ट्राय पॉड, सह मादक द्रव्य जप्त केली
नाशिक : इगतपूरीमध्ये रविवारी पहाटे मानस रिसॉर्ट हद्दीतील स्काय ताज विला या बंगल्यावर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने शनिवारी मध्यरात्री ही कारवाई केली. या कारवाईत 22 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील 4 महिला ह्या दक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील काम करणाऱ्या आहेत व 1 महिलेने बिग बॉस या शोमध्ये काम केले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
10 पुरुष, 12 महिलांचा समावेश
पोलिसांना आपल्या खबऱ्या मार्फत या बंगल्यात रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या पार्टीत दहा पुरुष आणि 12 महिलांचा समावेश होता. 12 महिलांपैकी 4 महिला या फिल्म इंडस्ट्रीत काम करणाऱ्या आहेत. यावेळी पोलिसांनी घटनास्थळहून कॅमेरा, ट्राय पॉड, सह मादक द्रव्य जप्त केली
ड्रग्ज पार्टीसाठी अटक
दुसरीकडे, वाढदिवसानिमित्त ड्रग्ज पार्टी करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रीला काही दिवसांपूर्वी मुंबईत अटक करण्यात आली होती. सांताक्रुझमधील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये संबंधित अभिनेत्री मित्रांसोबत ड्रग्ज पार्टी करताना रंगेहात सापडली होती. बॉलिवूडमध्ये लहान मोठे रोल करणाऱ्या या अभिनेत्रीला पोलिसांनी पकडले होते. पार्टीमध्ये ड्रग्जचा वापर होत असल्याची सूचना पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी छापा टाकून या प्रकाराची शहानिशा केली. त्यानंतर अभिनेत्रीला मित्रासोबत अटक करण्यात आली. हॉटेलच्या एका रुममध्ये ती चरस पित असल्याची माहिती पोलिसांनी दिली.