प्रभाग रचनेतील बदलांवरून राज ठाकरेंचा राज्य सरकारला सवाल..,अशी पद्धत कुठल्या देशात?

आपल्याला हव्या त्या पद्धतीने प्रभागरचना करायची आणि पैसा ओतून निवडणुका जिंकायची. या पद्धतीचा त्रास लोकांना का, लोकांनी एकाऐवजी 3-3 उमेदवारांना का मतदान करायचं? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी कार्यकर्त्यांच्या नेमणूका घेऊन त्यांचं अभिनंदन केलं. परंतु प्रभाग रचनेतील बदलांवरून राज ठाकरेंनी राज्य सरकारवर संताप व्यक्त केला आहे. या तीघांचं सरकार आलयं त्यावेळी त्यांनी प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे दिल्यानंतर एक प्रभाग आणि एक उमेदवार असा ठराव करण्यात आला होता. त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाने देखील राज्य सरकारला सांगितलंय की, एकच उमेदवारचं उभा करायचा आहे. परंतु काल सरकारने प्रभाग तीनची पद्धत ठरवली आहे. मुळात अशी पद्धत कुठल्याही देशात नाहीये, असा संताप राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर व्यक्त केला आहे.

    भाजपा आणि शिवसेनेचं सरकार आलं तेव्हा…

    2012 मध्ये पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं जेव्हा सरकार होतं. तेव्हा फक्त एक असा उमेदवार होता. प्रभाग नावाची काही गोष्टचं नव्हती. त्यावेळी त्यांनी दोनचा एक प्रभाग अशी नवीन पद्धत सुरू केली होती. त्यानंतर भाजपा आणि शिवसेनेचं सरकार आलं तेव्हा त्यांनी चारचा प्रभाग अशी पद्धत सुरू केली होती. असे राज ठाकरे म्हणाले.

    पुढे म्हणाले की, आता परत एकदा या तीघांचं सरकार आलयं त्यावेळी त्यांनी प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे दिल्यानंतर एक प्रभाग आणि एक उमेदवार असा ठराव करण्यात आला होता. त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाने देखील राज्य सरकारला सांगितलंय की, एकच उमेदवारचं उभा करायचा आहे. परंतु काल सरकारने प्रभाग तीनची पद्धत ठरवली आहे. मुळात अशी पद्धत कुठल्याही देशात नाहीये, असे राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.

    आपल्याला हव्या त्या पद्धतीने प्रभागरचना करायची आणि पैसा ओतून निवडणुका जिंकायची. या पद्धतीचा त्रास लोकांना का, लोकांनी एकाऐवजी 3-3 उमेदवारांना का मतदान करायचं? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. जनतेला गृहीत धरुन हवे ते करायचं, हे योग्य व कायदेशीर नाही. निवडणूक आयोगाने यावर कारवाई केली पाहिजे, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.