मनसे सत्तेत असताना काय मिळालं, याचा लोकांनी विचार करावा : राज ठाकरे

भाजपा आणि शिवसेनेचं सरकार आलं तेव्हा त्यांनी चारचा प्रभाग अशी पद्धत सुरू केली होती. आता परत एकदा या तीघांचं सरकार आलयं त्यावेळी त्यांनी प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे दिल्यानंतर एक प्रभाग आणि एक उमेदवार असा ठराव करण्यात आला होता. त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाने देखील राज्य सरकारला सांगितलंय की, एकच उमेदवारचं उभा करायचा आहे. परंतु काल सरकारने प्रभाग तीनची पद्धत ठरवली आहे. मुळात अशी पद्धत कुठल्याही देशात नाहीये, असे राज ठाकरे यांनी सांगितलं आहे. 

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. आज कार्यकर्त्यांच्या नेमणूका असल्यामुळे त्याचं अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या असं राज ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले. महानगरपालिकेची यंत्रणा ही लोकांसाठी असते आणि लोकांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे की, आमच्या काळ्यातल्या पाच वर्षामध्ये त्यांना काय  मिळालं आणि त्याच्यानंतरच्या पाच वर्षामध्ये काय परिस्थिती निर्माण झाली. आमची लोकं सांगतील, ते मी सुद्धा सांगत होतो. पण जनतेलाही ही गोष्ट कळणं खूप गरजेचं आहे की, आपण कोणाकडून कोणाला आणलयं आणि आणल्यानंतर आपल्या हाताला काय लागलं, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलं आहे.

    2012 मध्ये पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं जेव्हा सरकार होतं. तेव्हा फक्त एक असा उमेदवार होता. प्रभाग नावाची काही गोष्टचं नव्हती. त्यावेळी त्यांनी दोनचा एक प्रभाग अशी नवीन पद्धत सुरू केली होती. त्यानंतर भाजपा आणि शिवसेनेचं सरकार आलं तेव्हा त्यांनी चारचा प्रभाग अशी पद्धत सुरू केली होती. आता परत एकदा या तीघांचं सरकार आलयं त्यावेळी त्यांनी प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे दिल्यानंतर एक प्रभाग आणि एक उमेदवार असा ठराव करण्यात आला होता. त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाने देखील राज्य सरकारला सांगितलंय की, एकच उमेदवारचं उभा करायचा आहे. परंतु काल सरकारने प्रभाग तीनची पद्धत ठरवली आहे. मुळात अशी पद्धत कुठल्याही देशात नाहीये, असे राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.