चंपाषष्ठीचे निमित्त मनमाडला रंगली रेड्यांची झूंज

भाऊबीजनंतर काल गवळी समाज व शहर दूध संघातर्फे शहरातील स्टेडियमवर रेड्यांची झुंज आयोजित आली होती. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी शहर परिसरातील मोठ्या संख्येने गवळी बांधव त्यांचे रेडे घेऊन आले होते. टकरीत जिंकलेल्या रेड्याच्या मालकाला एक हजारपासून ११ हजार रुपये रोख आणि ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

    मनमाड : गवळी समाजातर्फे भाऊबिजेनंतर चंपाषष्टीला रेड्यांची झूंज लावण्याची परंपरा अाहे. त्यानुसार काल ऋषी वाल्मिकी स्टेडियमवर गवळी समाज आणि दूध संघातर्फे ही परंपरा पाळत रेड्यांची झुंज आयोजित करून चंपाषष्टी साजरी करण्यात आली. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी शहर परिसरातील मोठ्या प्रमाणात गवळी बांधव त्यांचे रेडे घेऊन आले होते. झुंज जिंकणाऱ्या रेड्याच्या मालकाला रोख बक्षीस आणि स्मृती चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. रेड्यांच्या झुंजीचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती

    दाेन वर्षांपासून झूंज नाही
    शहर परिसरासह ग्रामीण भागात गवळी समाजाची मोठी संख्या आहे. त्यांच्यात भाऊबीजेनंतर चंपाषष्टीला रेड्यांची झुंज लावण्याची गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. मात्र कोरोनामुळे दोन वर्षांपासून या झुंजी बंद होत्या परंतु आता कोरोना आटोक्यात आल्यामुळे.

    विजेत्याला राेख पािरताेषिक आणि ट्राॅफी
    भाऊबीजनंतर काल गवळी समाज व शहर दूध संघातर्फे शहरातील स्टेडियमवर रेड्यांची झुंज आयोजित आली होती. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी शहर परिसरातील मोठ्या संख्येने गवळी बांधव त्यांचे रेडे घेऊन आले होते. टकरीत जिंकलेल्या रेड्याच्या मालकाला एक हजारपासून ११ हजार रुपये रोख आणि ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. शिवाय या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच रेड्यांच्या मालकांचाही दूध संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. रेड्यांच्या झुंजीचा थरार पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली होती. जोपर्यंत आम्ही रेड्यांची झुंज लावत नाही; तोपर्यंत आमची भाऊबीज आणि चंपाषष्टी साजरी होत नाही, असे गवळी बांधवानी सांगितले.