
-दैनिक "नवराष्ट्र" प्रतिनिधीचा आंखो देखा प्रकार...
नाशिक : शहरात कोरोनाबधितांनी हाहाकार माजवला आहे. महापालिका मास्क नसणाऱ्यांवर आणि हॉटेल्स चालकांवर नियम धाब्यावर बसवले म्हणून दंडात्मक कारवाई करत आहे. मात्र, काही ठिकाणी कुंपनच शेत खात असल्याचे चित्र आहे.
असाच दैनिक “नवराष्ट्र” प्रतिनिधीचा आंखो देखा प्रकार…
स्थळ : गडकरी चौकातील नावाजलेले स्वीट्स..
(नेहमीसारखी गर्दी, कोरोना म्हणून तिथला कामगार वर्ग ग्राहकांना बाजूला करतोय.. एकाच बाजूने वरती या म्हणून सूचना देतोय..)
त्यातच दुसऱ्या बाजूने तीन चार महापालिका कर्मचारी स्वीट्स मध्ये येतात आणि…
मनपा कर्मचारी १ : अरे काय गर्दी आहे रे ही..
मनपा कर्मचारी २ : घ्या पावती घ्या..
स्वीट्सचा कर्मचारी : साहेब, कुठे गर्दी आहे..
(ग्राहकांकडे बघून.. ए अरे साहेब, नको ना गर्दी करू इकडे..)
स्वीट्सचा कर्मचारी : साहेब, गरमी खूप आहे.. (कर्मचाऱ्याकडे बघून, “ए, जा रे लस्सी आण साहेबांना.. ३ आण”)
मनपा कर्मचारी २ : चार आण चार..
दै. नवराष्ट्र प्रतिनिधी : काय साहेब, फाडली का पावती..?
मनपा कर्मचारी १ : नाही ओ, आता समज देऊ.. लस्सी घेऊ सायंकाळी ६ वाजता बघू काय परिस्थिती आहे..
आता यानंतर त्यांनी लस्सीचे पैसे दिले.. की लस्सीवर पावती मिटवली… देव जाणे..