लाल कांद्याचे दर कोसळले ; ८ दिवसांत १७०० रुपयांची घसरण

नाशिक : नवीन लाल कांदा आवक हळूहळू वाढू लागल्याने भावातील घसरण दिवसेंदिवस वाढत चालली आहे. १२ डिसेंबर रोजी सरासरी ३१०० रुपये क्विंटल विकला गेलेला लाल कांदा आता सरासरी १४०० रुपयांवर आला आहे. आठ दिवसांत लाल काद्यांच्या दरात सतराशे रुपयांची घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांना आपला कांदा न परवडणाऱ्या दरात विकालवा लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर पुन्हा कता आर्थिक संकट उभे ठाकले आहे.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दिवाळीदरम्यान राज्यात कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. मात्र मागील काही दिवसांपासून दररोज कांद्याच्या दरात घसरण होत चालली आहे. एकीकडे स्थानिक कांद्याच्या दरात घसरण होत आहे तर दुसरीकडे तुर्की आणि इजिप्तचा कांदादेखील बाजारात दाखल झाला आहे. शेतमालाचे दर दररोज घसरत चालल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहे. त्यातच आता लाल कांद्याच्या दराला उतरती कळा लागल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरीही संकटात सापडले आहे.

गेल्या ७ दिवसांतील दर
१२ डिसेंबर – ३१०० रुपये प्रति क्विंटल

१५ डिसेंबर – २७५० रुपये प्रति क्विंटल

१६ डिसेंबर – २४५० रुपये प्रति क्विंटल

१७ डिसेंबर – २४५० रुपये प्रति क्विंटल

१८ डिसेंबर – १९५० रुपये प्रति क्विंटल

१९ डिसेंबर – १८०० रुपये प्रति क्विंटल

२० डिसेंबर – १४०० रुपये प्रति क्विंटल