लासलगावची पाणीटंचाई दूर करा ; सेना पदाधिकाऱ्यांचे जि.अध्यक्षांना साकडे

लासलगाव विंचूरसह सोळा गाव समितीच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारची कारणे देऊन गावातील नागरिकांना पंधरा सोळा दिवसाआड पिण्याचा पाणीपुरवठा होत असल्याने समस्या शिष्टमंडलाने मांडल्या. या गोष्टीची दखल आणि पिण्याच्या पाण्याचे गांभीर्य पाहून अध्यक्षांनी तात्काळ निफाड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संदीप कराड यांना पाणीपुरवठा सुरळीत कसा होईल? याबाबत सूचना केल्या.

    लासलगाव : विंचूरसह सोळा गाव पाणीपुरवठा योजनेच्या बेजबाबदार नियोजनामुळे योजनेतील लाभार्थी गावांना गावातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणीपुरवठ्याच्या नियाेेजनशून्य कारभारामुळेच नागरिकांना या त्रासाला सामाेरे जावे लागत असल्याने शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली शिष्टमंडळाने जि. प. अध्यक्षांची भेट घेऊन यात लक्ष घालण्याची मागणी केली.

    लासलगाव विंचूरसह सोळा गाव समितीच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारची कारणे देऊन गावातील नागरिकांना पंधरा सोळा दिवसाआड पिण्याचा पाणीपुरवठा होत असल्याने समस्या शिष्टमंडलाने मांडल्या. या गोष्टीची दखल आणि पिण्याच्या पाण्याचे गांभीर्य पाहून अध्यक्षांनी तात्काळ निफाड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संदीप कराड यांना पाणीपुरवठा सुरळीत कसा होईल? याबाबत सूचना केल्या.

    शिवसेनेचे शिष्टमंडळ निफाड येथे पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांना भेटण्यास गेले असता ते बाहेरगावी असल्यामुळे त्यांनी विस्ताराधिकारी सोनवणे यांना शिष्टमंडळाचे पिण्याच्या पाण्यासंदर्भात तात्काळ नियोजन करा, असे सांगितले. त्यामुळे सोनवणे यांनी लासलगाव विंचूर सोळा गाव पाणीपुरवठा समितीचे सचिव शरद पाटील यांना तीन दिवसांत संपूर्ण लाभार्थी गावांतील नागरिकांना पिण्याचे पाणी तीन दिवसाच्या आत सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश पाटील, युवा सेना उपजिल्हाप्रमुख रविराज शिंदे, ग्रामपंचायत सदस्य केशवराव जाधव, सामाजिक कार्यकर्ते संदीप पवार आदी उपस्थित होते.