संजय राऊतांच्या या विधानामुळे कॉंग्रेसमध्ये नाराजी होण्याची शक्यता ? म्हणाले “सोनिया गांधी राजकारणात निष्क्रीय”

शरद पवारांनी युपीएचे नेतृत्व करावं, अशी आमची इच्छा आहे. आतापर्यंत काँग्रेसनं नेतृत्व केलं. मात्र सोनिया गांधी सध्या सक्रीय राजकारणात नाहीत. त्यामुळे देशाला सक्रीय नेतृत्वाची गरज आहे. आणि शरद पवार हे सक्रीय नेतृत्व आहेत. त्यामुळे पवारांनी यूपीएचं नेतृत्व करावं अशी इच्छा राऊतांनी व्यक्त केली आहे.

    नाशिक : शिवसेना खासदार संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर होते. त्यांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूवर आढावा घेतला. यावेळी पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षावर निशाणा साधला आहे. सचिण वाझे प्रकरणाबाबत म्हणाले की, NIA ला एवढ्या लवकर येण्याची गरज नव्हती. NIA जो तपास करायचा तो करुद्या. मुंबईचे पालीस, माहाराष्ट्राचे एटीएस सक्षम आहे. मात्र, केंद्रात विरोधी सरकार आहे. विरोधी पक्षांची वेगळीच भूमिका आहे. त्यामुळे ते राज्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात. मात्र, राज्यातील सरकारला काहीही फरक पडणार नाही, असं राऊत म्हणाले.

    दरम्यान राऊतांनी कॉंग्रेसच्या नेतृत्वाबद्दल प्रतिक्रीया दिली आहे. शरद पवारांनी युपीएचे नेतृत्व करावं, अशी आमची इच्छा आहे. आतापर्यंत काँग्रेसनं नेतृत्व केलं. मात्र सोनिया गांधी सध्या सक्रीय राजकारणात नाहीत. त्यामुळे देशाला सक्रीय नेतृत्वाची गरज आहे. आणि शरद पवार हे सक्रीय नेतृत्व आहेत. त्यामुळे पवारांनी यूपीएचं नेतृत्व करावं अशी इच्छा राऊतांनी व्यक्त केली आहे.

    दरम्यान महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिक शहराला काय हवं आहे ? काय योजना राबवता येतील, यावाठी शिवसेनेची योजना तयार होत आहे. याबाबत सर्व माहिती माझ्याकडे आहे. ती माहिती मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देणार असल्याचं राऊतांनी सांगितलं.