नाशिकमधील १ली ते ८वी पर्यंतच्या शाळा सोमवारपासून बंद; वाचा काय आहेत नवे निर्बंध

सोमवारपासून (ता.१०) १ली ते ८वी प्रर्यंतच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद, फक्त दहावी-बारावीचे वर्ग सुरु राहणार आहे. ३१ जानेवारीपर्यंत पुन्हा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे.

  नाशिक : नाशिकमध्ये कोरोना(nashik corona cases) रुग्णात मोठी वाढ होत आहे. यामुळे प्रशासनाने कठोर निर्बंध (restrictions)लावण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत. आज संध्याकाळी यासंदर्भात बैठक घेण्यात आली.लहान मुलांना संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे सोमवारपासून (ता.१०) १ली ते ८वी प्रर्यंतच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद, फक्त दहावी-बारावीचे वर्ग सुरु राहणार आहे. ३१ जानेवारीपर्यंत पुन्हा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी माध्यमांशी बोलतांना निर्बंधासंदर्भात माहिती दिली.

  • काय आहेत नियम
  • कोरोनाचे दोनही डोस घेतल्याशिवाय सरकारी आणि निमशासकीय कुठेही प्रवेश मिळणार नाही
  • लग्न देखील नागरिकांनी साधेपणाने करावा ही विनंती
  • लग्न सोहळ्यात नियम मोडले तर यापुढे कडक कारवाई करण्यात येईल
  • सर्व प्रकारच्या यात्रा बंद राहतील जोपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत तोपर्यंत हे नियम लागू राहतील
  • मंदिरात देखील गर्दी होता कामा नये पुजारी आणि इतर लोकांनी ही काळजी घ्यावी
  •  नाशिकमध्ये नो लस नो राशन उपक्रम करणार सुरू
  • आठ दिवसाची नागरिकांना देण्यात आली आहे वेळ
  • आठ दिवसात नागरिकांनी लस घेतली नाहीतर राशन मिळणार नाही