
हिराबाई नेहे यांचे शेत अतिशय हलक्या प्रतीचे म्हणजेच मुरमाड प्रकारचे असून मागील वर्षीच्या खरिपाच्या ऑगस्ट महिन्यात त्यांनी कांदा पीक लावले होते. त्या पिकाच्या कडेला त्यांनी हा रताळाच्या वेल लावला होता.
नाशिक : संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथे तब्बल सात किलोचे रताळाचे आढळले आहे. यामुळे या रताळ्याची राज्यात चर्चा होते आहे. हा निसर्गाचा चमत्कार सावरगावतळ येथील हिराबाई नेहे यांच्या शेतात झाला आहे. हिराबाई नेहे यांचे शेत अतिशय हलक्या प्रतीचे म्हणजेच मुरमाड प्रकारचे असून मागील वर्षीच्या खरिपाच्या ऑगस्ट महिन्यात त्यांनी कांदा पीक लावले होते. त्या पिकाच्या कडेला त्यांनी हा रताळाच्या वेल लावला होता. जेथे आता तीन चार महिन्यापासून कोणतेही पीक नाही त्यामुळे तेथे पाणी देण्याचा प्रश्नच नसतांना त्या एकाच रताळी च्या वेलाला जमिनीत एकच सात किलोवजनाचे रताळयाचे कंद आले आहे. त्याला कोणत्याही प्रकारचे खत, औषध किंवा चार महिन्यापासून पाणी सुद्धा नसतांना कंद आल्याने आता या सात किलोच्या रताळ्याची चर्चा राज्यभरात होऊ लागली आहे.