धक्कदायक ! जन्मदात्याच्या चिथावणीतून सख्ख्या भावांनी भावाचाच केला खून ; ११२ दिवसांनी प्रकार उघडकीस,तिघांना अटक

येवला : तालुक्यातील नगरसुल येथील दोन सख्ख्या भावांनी वडिलांच्या चिथावणीवरून व्यसनाधीन सख्ख्या भावाचा खून केल्याचा प्रकार तब्बल ११२ दिवसांनी उघड झाला असून या प्रकाराने तालुक्यात खळबळ उडाली आहे

येवला : तालुक्यातील नगरसुल येथील दोन सख्ख्या भावांनी वडिलांच्या चिथावणीवरून व्यसनाधीन सख्ख्या भावाचा खून केल्याचा प्रकार तब्बल ११२ दिवसांनी उघड झाला असून या प्रकाराने तालुक्यात खळबळ उडाली आहे

याबाबत अधिक माहिती अशी की, नगरसुल येथे सोमनाथ आसाराम वरे हे आपल्या त्यांना किरण, भिमराज व अमोल अशी तीन अपत्य असून यातील सोमनाथ वरे (१८) हा व्यसनाधीन होता त्याच्या चुकीच्या वागणुकीमुळे कुटूंबाची समाजात बदनामी होत होती त्याला अनेकदा समजावूनही तो ऐकायला तयार नव्हता चुकीची वागणुक व समाजातील होणारी बदनामी केवळ याच कारणावरून वडील सोमनाथ वरे या जन्मदात्या पित्याने चिथावणी दिल्यामुळे अमोल सोमनाथ वरे याचे सख्खे भाऊ संशयित आरोपी भीमराज सोमनाथ वरे व किरण सोमनाथ वरे या दोघांनी ३० ऑगस्ट २०२० रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास दोरीच्या सहाय्याने अमोलचा गळा आवळून खून केला व पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह बोलेरो जीपमध्ये टाकून नगर जिल्ह्यातील मळेगाव येथून वाहणाऱ्या गोदावरी नदीत अमोलच्या पोटाला दगड बांधून मृतदेह वाहत्या पाण्यात फेकून दिला तब्बल ११२ दिवसानंतर हा गुन्हा उघड झाला असून गुप्त माहिती आधारे या मर्डर मिस्ट्रीचा उलगडा येवला तालुका पोलिसांनी केला आहे या प्रकरणी येवला तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे याप्रकरणी पुढील तपास येवला तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी हे करत आहेत केवळ व्यसनामुळे सख्ख्या भावाचा जीव का घेतला गेला आणि त्याला खुद्द जन्मदात्या पित्याने चिथावणी का दिली हे पोलीस तपासात निष्पन्न होईलच मात्र नगरसूल येथील या घटनने संपूर्ण येवला तालुका हादरला आहे