धक्कादायक! व्याजाचे पैसे दिले नाही म्हणून महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न

नांदगावपासून काही अंतरावर असलेल्या पिंप्राळे येथील एका गरीब आदिवासी दाम्पत्याने संगीता वाघ या खाजगी सावकारी करणाऱ्या महिलेकडून व्याजाने पैसे घेतले होते. व्याज आणि मुद्दल रक्कम परत करून देखील ही महिला या दाम्पत्याकडे वांरवार पैशांची मागणी करत होती. या दाम्पत्याने आम्ही सर्व पैसे तुला दिले आहेत, असे सांगितल्यावर या महिलेला राग अनावर झाला आणि तिने अगोदर पत्नीला चपलांनी बेदम मारहाण करून तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला.

    नांदगाव : खाजगी सावकारांच्या जाचाला कंटाळून धुळ्याच्या एका कापड व्यापाऱ्याने मनमाडला येऊन नुकतीच आत्महत्त्या केली हाेती. त्यानंतर अाज आज एका महिला सावकाराची दबंगगिरी समोर आली अाहे. या महिलेने व्याजाने दिलेले पैसे वसूल करण्यासाठी एका दाम्पत्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना नांदगावच्या पिंप्राळे येथे घडली.

    या क्रूर महिलेने केवळ मारहाणच केली नाही तर पिडीत महिलेला विवस्त्र करण्याचा देखील प्रयत्न केला. हा व्हिडियो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर तो पाहून सर्वत्र संतापाची लाट उसळली असून पीडित गरीब महिलेची अब्रू अशा पद्धतीने चव्हाट्यावर आणणाऱ्या सावकार महिलेवर कडक कारवाई करण्याची मागणी बिरसा क्रांती दल या संघटने केली आहे. या महिलेला तातडीने अटक करून कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा या संघटनेने दिला आहे

    याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदगावपासून काही अंतरावर असलेल्या पिंप्राळे येथील एका गरीब आदिवासी दाम्पत्याने संगीता वाघ या खाजगी सावकारी करणाऱ्या महिलेकडून व्याजाने पैसे घेतले होते. व्याज आणि मुद्दल रक्कम परत करून देखील ही महिला या दाम्पत्याकडे वांरवार पैशांची मागणी करत होती. या दाम्पत्याने आम्ही सर्व पैसे तुला दिले आहेत, असे सांगितल्यावर या महिलेला राग अनावर झाला आणि तिने अगोदर पत्नीला चपलांनी बेदम मारहाण करून तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पतीला काठीने जबर मारहाण केली. दोघा पती-पत्नीला क्रूर पद्धतीने मारहाण करतांना त्याचा व्हिडियो देखील बनवून तो सोशल मिडीयावर व्हायरल केला. हा व्हिडियो पाहून सर्वांना मोठा धक्का बसला. या महिलेला तातडीने अटक करून तिच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कातकडे यांनी दिली.