शाळा व महाविद्यालयात लसीकरण सुरू करा ; भाजपा विद्यार्थी आघाडीची मागणी

केंद्र सरकारने ०३ जानेवारी २०२२ पासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्याचे जाहीर केले आहे.या वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण त्या-त्या शाळा व महाविद्यालयात करण्यात यावे. यामुळे कोणत्या विद्यार्थ्यांने लस घेतली आहे व कोणत्या विद्यार्थ्यांने लस घेतली नाही.

    येवला : १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याची घोषणा केंद्रसरकारने केली असून, त्या अनुषंगाने या वयोगटातील लसीकरण विक्रमी वेळेत व सुनियोजितपणे पूर्ण करण्यासाठी शाळा व महाविद्यालयात लसीकरण मोहीम राबविणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाने शाळा महाविद्यालयात लसीकरण मोहीम सुरू करावी, अशी मागणी भाजपा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष समीर समदडीया यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

    पालकांकडून टाळाटाळ
    निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने ०३ जानेवारी २०२२ पासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्याचे जाहीर केले आहे.या वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण त्या-त्या शाळा व महाविद्यालयात करण्यात यावे. यामुळे कोणत्या विद्यार्थ्यांने लस घेतली आहे व कोणत्या विद्यार्थ्यांने लस घेतली नाही. याबाबतची माहिती विद्यालयात नोंद राहील शाळा महाविद्यालयात लसीकरणास मोहीम राबवल्यास लसीकरणाला गती मिळेल जे पालक मुलांना लस देण्यास टाळाटाळ करतील. त्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करणे शक्य होईल. तरी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून शाळा व महाविद्यालयात लसीकरण मोहीम सुरू करावी, अशी मागणी भाजपा विद्यार्थी आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

    यांची उपस्थिती
    यावेळी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष समीर समदडीया, स्वप्नील माहुलकर, सतीश व्यवहारे, यश सोनवणे, अनिकेत फुलदेवरे आदी उपस्थित होते.